मृत्यूची खोटी बातमी देऊन पूनम पांडे अडचणीत, गुन्हा दाखल होणार?
बाॅलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूनम पांडे हिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. पूनम पांडे हिची ही पोस्ट पाहून लोक हैराण झाले. हेच नाही तर अनेकांनी थेट दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.
मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे गुरूवारी रात्री निधन झाल्याचे सांगितले गेले. धक्कादायक म्हणजे थेट पूनम पांडे हिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले गेले की, गर्भाशयातील कॅन्सरमुळे पूनम पांडे हिचे निधन झाले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र, पूनम पांडे हिच्यावर नेमके अंत्यसंस्कार कुठे होणार याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. पूनम पांडे हिची बहीण मुंबईतील वरळी भागात राहते. तिला देखील संपर्क करण्यात आला. मात्र, तिचाही फोन बंद होता. यामुळे पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल अधिकच संभ्रम हा निर्माण झाला. पूनम पांडे हिच्या मुंबईतील घराकडे चाहत्यांना धाव घेतली.
शेवटी आज पूनम पांडे हिने सोशल मीडियावर व्हिडीओ करत आपण जिवंत असल्याचे सांगितले. हेच नाही तर यावेळी पूनम पांडे ही सर्वांची माफी मागताना देखील दिसली. मात्र, आता या सर्वप्रकारानंतर लोक हे चांगलेच संतापले आहेत. हेच नाही तर फक्त चर्चेत राहण्यासाठी पूनम पांडे हिने निधनाचे नाटक केले. यामुळे लोकही हैराण आहेत.
पूनम पांडे हिने स्टंट करत आपल्या निधनाचे नाटक रचले. आता थेट अनेकांनी पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीच करून टाकली आहे. हेच नाही तर पूनम पांडे हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जातंय. आता हे पाहण्यासारखे ठरणार की, खरोखरच पूनम पांडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल होतो का?
View this post on Instagram
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हेच नाही तर लोकांची फसवणूक केल्या प्रकरणात पूनम पांडे हिच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. पूनम पांडे हिच्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत तिचे निधन झाल्याचे सांगितले गेले.
हेच नाही तर पूनम पांडे हिचे निधन गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले. पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. आता थेट पूनम पांडे हिने सोशल मीडियावर व्हिडीओ करत आपण जिवंत असल्याचे जाहिर केले.