अभिनेत्रीसमोरच चाहत्यावर अत्याचार, तो जीवाची भीक मागत होता पण तिने…
Darshan and pavitra gowda : अभिनेत्याने अभिनेत्रीसोबत आपल्याच चाहत्याच्या हत्येचा कट रचला होता. पवित्रा गौडाला रेणुकास्वामीवर अत्याचार होताना पाहायचे होते. हत्येच्या दिवशी ती गुन्ह्याच्या ठिकाणी हजर होती. आता दोघे ही तुरुंगात आहेत.
कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याने त्याच्याच चाहत्याचा खून केला आहे. रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली अभिनेता सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणात नवीन अपडेट्स समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे बोलले जात आहे की अभिनेत्री पवित्रा गौडा ही देखील गुन्हा झाला त्या ठिकाणी उपस्थित होती. कारण तिला रेणुकास्वामींवर अत्याचार होताना पाहायचे होते. पवित्रा हिनेच दर्शनला रेणुकास्वामीला धडा शिकवण्यासाठी चिथावणी दिली होती, असे पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात आधीच उघड झाले आहे.
8 जून रोजी रेणुकास्वामीचे त्याच्या मूळ गावी चित्रदुर्गातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला 200 किलोमीटर दूर बंगळुरू येथे नेण्यात आले जेथे त्यांना एका गोडाऊनमध्ये बंद करण्यात आले. यानंतर दर्शन आणि पवित्रासह 17 जणांनी रेणुकास्वामींना एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला.
रेणुकास्वामी यांना विजेचे शॉक देण्यात आले
रेणुकास्वामी यांना आरोपींनी विजेचे शॉक देखील दिले. शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झाले आहे. त्यांना लाठ्या-काठ्याने मारहाण करून शरीराच्या अनेक भागांवर जखमा दिल्या. इतकंच नाही तर यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. मृतदेह सापडला तेव्हा त्याचा एक कान देखील गायब असल्याचं समोर आलं. रेणुकास्वामी यांच्या प्रायव्हेट पार्टवरही जखमेच्या खुणा होत्या.
दर्शनला अटक झाल्यानंतर त्याची को-स्टार अनुषा राय हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात दर्शनच्या सहभागाबद्दल तिने आश्चर्य व्यक्त केले आहे. अनुषा म्हणाली की- त्याला राग खूप लवकर येतो पण तो खूप चांगला माणूस आहे. लोक त्याच्याशी सावधपणे बोलतात कारण त्याला सहज राग येतो. जेव्हा मी त्याच्याशी बोलते तेव्हा मी माझ्या मर्यादेत राहते. स्वत: दर्शनने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या रागाबद्दल सांगितले आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी दिले 40 लाख
हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी दर्शनने त्याच्या मित्राकडून ४० लाख रुपये उसने घेतल्याचे देखील समोर आले होते. खुद्द दर्शननेच पोलिसांना याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने त्याचा मित्र मोहन राज याच्याकडून ४० लाख रुपये उसने घेतले होते, जेणेकरून तो हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी हे पैसे त्याच्या साथीदारांना देऊ शकेल.
दर्शन 11 जूनपासून तुरुंगात
33 वर्षीय रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली दर्शन 11 जूनपासून तुरुंगात आहे. आतापर्यंत पोलीस तपासात या हत्येशी संबंधित माहिती समोर आली आहे की, 33 वर्षीय मृत रेणुकास्वामी हे अभिनेता दर्शनचे चाहते होते. जानेवारी 2024 मध्ये कन्नड अभिनेत्री पवित्रा गौडा हिने दर्शनसह 10 वी एनिवर्सरी साजरी केली. पण ते वादात सापडले कारण दर्शनचे आधीच लग्न झाले होते. या गोष्टीमुळे रेणुकास्वामी खूप संतापले. त्याने पवित्राला मेसेज करत दर्शनपासून दूर राहण्यास सांगितले. सुरुवातीला पवित्राने त्याच्या मेसेजकडे दुर्लक्ष केले, परंतु नंतर रेणुकास्वामीने आक्षेपार्ह संदेश पाठवून तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन आणि पवित्राने यानंतर मग रेणुकास्वामीच्या हत्येचा कट रचला.