‘माझ्या आयुष्याचे एकच ध्येय सलमान खानला जीवे मारणे’ लॉरेन्स बिश्नोई याने थेट..

Salman Khan : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खानच्या घरावर पहाटे आज गोळीबार करण्यात आलाय.

'माझ्या आयुष्याचे एकच ध्येय सलमान खानला जीवे मारणे' लॉरेन्स बिश्नोई याने थेट..
Lawrence Bishnoi and salman khan
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 11:51 AM

रविवारी पहाटे पाच वाजता सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारनंतर मोठी खळबळ ही बघायला मिळाली. हेच नाही तर दोन दिवसांपूर्वी ईदच्या दिवशी ज्या गॅलरीत उभे राहून सलमान खान चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसला त्याच गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे एक गोळी ही घरात गेल्याचे काही रिपोर्टनुसार सांगण्यात आलंय. तब्बल पाच गोळ्या सलमान खानच्या घरावर झाडण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय. या प्रकरणातील तपास देखील सुरू करण्यात आलाय.

आता या प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहेत. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्याचे समजताच लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आले. गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई याने याबद्दल थेट भाष्य केले होते.

लॉरेन्स बिश्नोई हा म्हणाला होता की, मी अजून गँगस्टरच झालो नाहीये. माझ्या आयुष्याचे एकच ध्येय आहे की, ते म्हणजे सलमान खान याला जीवे मारण्याचे. आता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सलमान खान त्याच्या सुरक्षेत असताना त्याला जीवे मारणार असल्याचे बिश्नोईने म्हटले होते .

लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या केलीये. आता लॉरेन्स बिश्नोईच्या भावानेच सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी ही घेतलीये. त्यावेळी लॉरेन्स बिश्नोई याने स्पष्ट केले होते की, ज्यावेळी सलमान खान हा माफी मागेल, त्यावेळी हा वाद आमच्यासाठी संपेल.

हेच नाही तर सलमान खानला बीकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागायला लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सांगण्यात आले. हेच नाही तर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान आणि सिद्धू मुसेवाला हे अहंकारी असल्याचे देखील म्हटले होते. काही दिवसांपूर्वी मेल करूनही सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली होती.

सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. मात्र, असे असतानाही त्याच्या घरावर गोळीबार झालाय. ज्यावेळी पहाटे हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. आता या प्रकरणात पोलिसांकडून काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.