मराठमोळ्या अभिनेत्रीवर ‘या’ व्यक्तीने केलेला बलात्काराचा प्रयत्न; धक्कादायक प्रसंगानंतर घेतला मोठा निर्णय

निर्जन ठिकाणी मराठमोळ्या अभिनेत्रीला पाहिल्यानंतर बळजबरी करणारा 'तो' कोण? 'त्या' प्रसंगातून अभिनेत्रीने स्वतःची सुटका तर केली पण...

मराठमोळ्या अभिनेत्रीवर 'या' व्यक्तीने केलेला बलात्काराचा प्रयत्न; धक्कादायक प्रसंगानंतर घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 11:40 AM

मुंबई | एक काळ मोठा पडदा गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आज झगमगत्या विश्वापासून फार दूर स्वतःचं आनंदी आयुष्य जगत आहेत. पण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्रींना अनेक संकटांचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अर्चना जोगळेकर (Archana Joglekar) यांना देखील अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. अखेर त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि झगमगत्या विश्वाला रामराम ठोकला. आज अर्चना जोगळेकर मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी त्यांची चर्चा कामय चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अर्चना जोगळेकर यांची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर, प्रसिद्ध कथक नृत्यांगना म्हणून देखील आहे.

एक काळ टीव्ही आणि सिनेमांमध्ये वर्चस्व असणाऱ्या अर्चना जोगळेकर यांच्यासोबत असं काही झालं, ज्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीसोबतच देश देखील सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अर्चना जोगळेकर यांच्यासोबत असं काय झालं होतं ज्यामुळे त्यांनी टोकाचा पाऊल उचलला.. याबद्दल जाणून घेवू. अर्चना जोगळेकर हे नाव फक्त सिनेमांमध्येच नाही तर, टीव्ही विश्वात देखील फार मोठं होतं.

अर्चना जोगळेकर यांनी ‘किस्सा शांती का’, ‘कर्णभूमी’ आणि ‘फूलवती’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. सिनेमांमध्ये देखील अर्चना जोगळेकर यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. पण उडिया भाषेतील एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यासोबत एक असा धक्कादायक प्रकार घडला ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली होती..

१९९७ साली जेव्हा अर्चना जोगळेकर उडिया भाषेतील एका सिनेमाचं शुटिंग करत होत्या. तेव्हा एक इसम चाहता म्हणून आला आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.. एवढंच नाही तर, जेव्हा त्या इसमाने अर्चना यांना निर्जन स्थाळी पाहिलं तेव्हा देखील त्याने अभिनेत्रीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.. तेव्हा अर्चना यांनी स्वतःला त्या इसमाच्या तावडीतून सोडवलं.. पण या घटनेचा अर्चना यांच्या मनावर खोल परिणाम झाला.

रिपोर्टनुसार, अभिनेत्रीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला त्यावेळी लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्यानंतर त्याला १८ महिन्यांची शिक्षा देखील झाली. या धक्कादायक घटनेनंतर अर्चना जोगळेकर यांनी इंडस्ट्री आणि झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. आता अर्चना जोगळेकर अमेरिकेत डान्स क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देत आहेत.

सध्या सर्वत्र अर्चना जोगळेकर यांची चर्चा रंगत आहे. कथक नृत्य क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या अर्चना जोगळेकर आज परदेशात भारतीय नृत्य कलेचा प्रसार करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.