कपिल शर्मा याने खरेदी केले प्रायव्हेट जेट?, तो फोटो व्हायरल, तब्बल…
कॉमेडियन कपिल शर्मा हा कायमच चर्चेत असतो. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर अनेक मोठे कलाकार हे आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्येही पोहोचतात. कपिल सोशल मीडियावरही सक्रिय असतो.
गेल्या अनेक वर्षांपासून कपिल शर्मा हा त्याच्या कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. विशेष म्हणजे कपिल शर्माचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. ज्यावेळी कपिल शर्मा मुंबईमध्ये दाखल झाला, त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हते. आता तो अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. कपिल शर्मा हा भारती सिंहला आपली लहान बहीण मानतो. कपिल शर्माच्या घरी कोणत्याही कार्यक्रम असो, त्याठिकाणी भारती सिंहला आमंत्रण असतेच. कपिल शर्मा याच्या द कपिल शर्मा शोला प्रेक्षकांच्या उदंड असा प्रतिसाद मिळतो.
विशेष म्हणजे कपिल शर्मा हा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कपिल दिसतो. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याने ओटीटीवर पर्दापण केले. प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना कपिल शर्मा हा दिसतो.
नुकताच कपिल शर्मा याने एक अत्यंत खास असा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. कपिल शर्मा याच्या फोटोमध्ये त्याची पत्नी देखील दिसत आहे. कपिल शर्मा याच्या फोटोच्या मागे प्रायव्हेट जेट दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी म्हटले की, कपिल शर्मा याच्या मागे दिसत असलेले प्रायव्हेट जेट त्याने खरेदी केले आहे.
एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, प्रायव्हेट जेट दाखवण्याची ही चांगली पद्धत आहे. दुसऱ्याने लिहिले की, वा कपिल भाई…तुम्ही फक्त गरीब असण्याच्या चर्चा करता आणि दुसरीकडे प्रायव्हेट जेट खरेदी करता. काही लोक प्रायव्हेट जेट खरेदी केल्याबद्दल कपिल शर्माला शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत.
शुभेच्छांचा वर्षाव हा कपिल शर्मा याच्यावर होताना दिसत आहे. अगदी काही वेळामध्येच कपिल शर्मा याचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. कपिल शर्मा हा आज टॉपचा कॉमेडियन आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक मोठे कलाकार हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचतात. अनेक मोठे कलाकार या शोमध्ये येऊन मस्ती करताना देखील दिसतात.