‘द कपिल शर्मा शो’च्या या जाहिरातीवर क्लिक करणे पडेल अत्यंत महागात, थेट बँक अकाऊंट होणार खाली, धक्कादायक प्रकार उघडकीस

द कपिल शर्मा शो हा कायमच चर्चेत असतो. कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आपल्या चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसतोय. सोशल मीडियावर कपिल शर्मा याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.

द कपिल शर्मा शोच्या या जाहिरातीवर क्लिक करणे पडेल अत्यंत महागात, थेट बँक अकाऊंट होणार खाली, धक्कादायक प्रकार उघडकीस
| Updated on: Sep 13, 2023 | 8:54 PM

मुंबई : काॅमेडिचा किंग अर्थात कपिल शर्मा हा गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) हा कायमच चर्चेत असतो. कपिल शर्मा याच्या शोमध्ये बाॅलिवूडचे मोठे स्टार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचतात. फक्त बाॅलिवूड स्टारच (Bollywood star) नाही तर कपिल शर्माच्या शोमध्ये क्रिकेटर आणि विविध क्षेत्रातील लोक येतात. बाॅलिवूड स्टारसोबत धमाल करताना कपिल शर्मा हा दिसतो.

द कपिल शर्मा या शोबद्दल चाहत्यांमध्ये कायमच क्रेझ बघायला मिळते. कपिल शर्मा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष बाब म्हणजे कपिल शर्मा हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. कपिल शर्मा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसतो.

बऱ्याच वेळा चाहत्यांच्या पोस्टलाही थेट कपिल शर्मा हा उत्तर देतो. कपिल शर्मा याने बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका केल्या. कपिल शर्मा याने नुकताच एक पोस्ट रिशेअर केलीये. ही पोस्ट पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक जाहिरात प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

या जाहिरातीमध्ये कपिल शर्मा याचा फोटो आणि सोनी टीव्हीचा लोगो देखील दिसत आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये एक नंबर देखील देण्यात आलाय. त्या जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, कपिल शर्मा याचा शो लाईव्ह प्रत्यक्ष बघण्यासाठी 5000 हजार रूपये भरा आणि शो लाईव्ह बघण्यासोबतच ड्रिक आणि पॉपकॉर्न फ्री मिळवा.

हीच जाहिरात कपिल शर्मा याने रिशेअर करत धक्कादायक खुलासा केला आहे. कपिल शर्मा शो लाईव्ह प्रत्यक्ष बघण्यासाठी आम्ही प्रेक्षकांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत. शोमध्ये प्रेक्षकांचा फ्रीमध्ये सहभाग असतो, असे सांगितले जात आहे. म्हणजेच ही जाहिरात फेक आहे. याबद्दल कपिल शर्मा याने मोठी माहिती शेअर केलीये.

कपिल शर्मा याने लिहिले की, ही फसवणूक आहे, लाइव्ह शूट पाहण्यासाठी आम्ही आमच्या प्रेक्षकांकडून एक पैसाही घेत नाहीत. कृपया अशा फसव्या लोकांपासून सावध रहा. धन्यवाद…आता कपिल शर्मा याची ही पोस्ट तूफान व्हायरल होत आहे. म्हणजेच काय तर कपिल शर्मा याच्या नावावर लोकांची फसवणूक केली जात आहे. ही जाहिरात फेक असल्याचे त्याने स्पष्ट केले.