थलापती विजय याच्या गाडीची तोडफोड, हैराण करणारा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याने स्वत:ला..
Thalapathy Vijay Video : अभिनेता थलापती विजय हा कायमच चर्चेत असतो. थलापती विजय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. थलापती विजय याचा एक हैराण करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : सुपरस्टार थलापती विजय हा कायमच चर्चेत असतो. थलापती विजय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. थलापती विजय याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. थलापती विजय याचे चित्रपट नेहमीच धमाका करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून थलापती विजय याचे एका मागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे थलापती विजय याचे हे चित्रपट धमाका करताना देखील दिसतात. थलापती विजय चाहता चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. थलापती विजय याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात.
थलापती विजय याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. थलापती विजय याचा हा व्हिडीओ पाहून लोक हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये थलापती विजय याच्या लग्झरी गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे देखील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय.
द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये थलापती विजय हा बिझी दिसतोय. यादरम्यानच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय, या व्हिडीओमध्ये चाहते हे थलापती विजयचे जोरदार स्वागत करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, थलापती विजय याच्या गाडीसमोर लोकांनी मोठी गर्दी केलीये. हेच नाही तर लोक हे गाडीवर चढताना देखील दिसत आहेत.
Another EXCLUSIVE VIDEO of The King – Thalapathy Vijay 👑#VIJAYStormHitsKerala @Actorvijay pic.twitter.com/3jMcAsZ8g7
— KERALA VIJAY FANS CLUB (@KVFC_Official) March 18, 2024
लोकांनी अभिनेत्याच्या गाडीला चारही बाजूंनी घेरले असून फुले टाकून विजय थलापतीचे स्वागत केले जातंय. यावेळी काही लोक अतिउत्साही झाल्याचे बघायला मिळतंय. यावेळी थलापती विजय याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत ही झाली नसल्याचे बघायला मिळतंय. विजयच्या गाडीची काच फुटल्याचे दिसतंय.
तब्बल 14 वर्षांनंतर थलापती विजय हा केरळला पोहचला आहे. यावेळी थलापती विजय याची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केलीये. आता थलापती विजय याच्या या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. बऱ्याच वेळ थलापती विजय याची गाडी गर्दीमध्ये अडकून पडल्याचे देखील सांगितले जातंय.