थोडक्यात वाचला राहुल वैद्य, चेहऱ्यापर्यंत आगीचा लोळ, हैराण करणारा व्हिडीओ, अखेर सेटवर…
एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओनंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण हे बघायला मिळतंय. फक्त हेच नाही तर शोमधील स्पर्धेकही चांगलेच घाबरल्याचे बोलले जातंय. सेटवरच आगीची घटना घडल्याने मोठी खळबळ ही बघायला मिळतंय. त्याचाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये लाफ्टर शेफबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळतंय. या शोमधून प्रेक्षकांचे भरपूर असे मनोरंजन होताना दिसत आहे. अनेक दिग्गज कलाकार ज्यांना अजिबातच जेवण बनवता येत नाही असे कलाकार थेट शोमध्ये येऊन विविध पदार्थ बनवताना दिसत आहेत. फक्त पदार्थच बनवणे नाही तर यासोबतच कॉमेडीचा जबरदस्त असा तडका देखील बघायला मिळतोय. लाफ्टर शेफमध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. अली गोनी आणि राहुल वैद्यची जोडी बिग बॉसनंतर लाफ्टर शेफच्या मंचावर धमाल करताना दिसत आहे. भारती सिंह देखील प्रेक्षकांना हसवण्यासाठी शोमध्ये आहेच.
प्रेक्षकांचे प्रेम लाफ्टर शेफला मिळत असतानाच आता शोच्या सेटवर अशा दोन घटना घडल्या आहेत की, ज्यानंतर स्पर्धकांमध्ये चांगलेच भितीचे वातावरण हे बघायला मिळतंय. रीम शेख हिच्यासोबत सेटवर एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा जळाला. ही घटना ताजी असतानाच अजून एक घटना घडलीये.
गायक राहुल वैद्य देखील या शोमध्ये सहभागी झालाय. राहुल वैद्य हा पदार्थ बनवत असताना त्याने पॅनमध्ये काहीतरी टाकले आणि थेट मोठा जाळ निघाला. हे इतके जास्त भयानक होते की, ती आग राहुल वैद्यच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचत होती. यावेळी राहुल वैद्य हा मागे जाताना दिसतोय. खूप मोठा अचानक जाळ पाहून राहुल भिलेला दिसतोय.
View this post on Instagram
हा जाळ पाहून इतरही स्पर्धेक घाबरलेले दिसत आहेत. जाळ दिसताच राहुल वैद्य मागे आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बघायला मिळतंय. आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. सुदैवाने या अपघातामध्ये राहुल वैद्यला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचेही सांगितले जातंय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
अनेकांचे म्हणणे आहे की, राहुल वैद्य हा थोडक्यात बचावला आहे. दुसरीकडे रीम शेखच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाल्याचे बघायला मिळतंय. राहुल वैद्य हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. काही दिवसांपूर्वीच राहुल वैद्यच्या लेकीचा वाढदिवस अत्यंत खास प्रकारे साजरा करण्यात आला. राहुल वैद्य लेकीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.