Marathi Serial : ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेत रघू आणि स्वातीच्या आयुष्यात माया नावाचं वादळ, ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका
'तुझ्या इश्क्काचा नादखुळा' मालिकेतील लाडकं कपल रघु आणि स्वातीच्या आयुष्यात संकट निर्माण करणारी माया खरंतर तिच्या नावा सारखीच मायावी आहे. आपला राग आपलं कृत्य आणि सोबतच स्वतःचा खरा चेहेरा इतरांना कधीही कळू न देण्यात ती सराईत आहे. (A storm called Maya in the life of Raghu and Swati in the series 'Tujhya Ishqacha Nadkhula')
मुंबई : सध्या तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये नवनवीन भाग भेटीला येत आहेत. तर स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘तुझ्या इश्काचा नादखुळा‘ (Tuzya Ishkacha Naad Khula) या मालिकेसुद्धा आता धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रघु आणि स्वातीच्या गोड गुलाबी नात्यात संकट निर्माण होणार आहे. रघु आणि स्वातीच्या आयुष्यात येणाऱ्या या वादळाचं नाव आहे माया.
‘तुझ्या इश्क्काचा नादखुळा’ ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर
खरतर अनेक अडचणींनंतर रघु आणि स्वातीचं नातं आता कुठं चांगलं खुलायला लागलं होतं. मात्र आता या वादळ्यामुळे म्हणजेच माया या पात्रामुळे ‘तुझ्या इश्क्काचा नादखुळा’ ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे.
अभिनेत्री प्रतीक्षा जाधव साकारतेय मायाची भूमिका
मायाच्या या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये वेगळी एक उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव ही मायाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रतीक्षाला याआधी बऱ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. तिचा स्वत:चा मोठा चाहता वर्ग आहे. महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रवाहवरील मालिका छोटी मालकीण आणि मोलकरीण बाई यात तिने सुंदर आणि लक्षवेधी भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता तिच्या या नवीन भूमिकेसाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.
काय आहे मायाची भूमिका
‘तुझ्या इश्क्काचा नादखुळा’ मालिकेतील लाडकं कपल रघु आणि स्वातीच्या आयुष्यात संकट निर्माण करणारी माया खरंतर तिच्या नावा सारखीच मायावी आहे. आपला राग आपलं कृत्य आणि सोबतच स्वतःचा खरा चेहेरा इतरांना कधीही कळू न देण्यात ती सराईत आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की कुलकर्णी कुटुंबात माया का येतेय ? कुलकर्णी कुटुंबात येण्यामागे तिचं नेमकं कोणतं षडयंत्र आहे?. सोबतच मायाच्या एण्ट्रीने रघू आणि स्वातीच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ होणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे मालिकेच्या पुढील भागांमधूनच उलगडतील. तेव्हा पाहायला विसरु नका तुझ्या इश्काचा नादखुळा.
संबंधित बातम्या
Photo: दिलखुलास हास्य… स्टायलिश फोटो… ती सोशल मीडियावर परत आलीय; हीना खानचे फोटो पाहाच!
Photo : मिथुनची सून मदालसा शर्माची स्पा पार्लरमध्ये धमाल, अनघा भोसलेसोबत फोटो शेअर
Birthday Special: राखीला किस, हिट अँड रनचा गुन्हा; तुरुंगातही जाऊन आला; वाचा मिका आणि त्याचे वाद!