हनी सिंह याच्याकडून हैराण करणारा खुलासा, म्हणाला, भारतात नाही तर ‘या’ देशात वाटते सर्वाधिक सुरक्षित, सिद्धू मुसेवाला याच्यानंतर…
हनी सिंह याने मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे हनी सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हनी सिंह याने नुकताच एका अत्यंत मोठा आणि हैराण करणारा खुलासा केलाय. हनी सिंह याचे बोलणे ऐकून लोकांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
हनी सिंह याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा बघायला मिळतो. हनी सिंह याने धमाकेदार असे अनेक गाणे बॉलिवूडला दिली आहेत. मात्र, मागच्या काही वर्षांपासून हनी सिंह गायब होता. त्या वर्षांमध्ये हनी सिंह नेमके काय करत होता, याचाही खुलासा त्याने काही दिवसांपूर्वी केला. त्याने नशेपासून दूर राहण्याचे आवाहन देखील चाहत्याने केले. ते दिवस आपल्यासाठी किती जास्त वाईट होते, याबद्दल बोलताना हनी सिंह दिसला. हनी सिंह याने मोठा संघर्ष करून परत एकदा धमाकेदार पद्धतीने पुनरागमन केले आहे. आता नुकताच हनी सिंह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही हैराण करणारे खुलासे हे हनी सिंह याच्याकडून करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून हनी सिंह हा भारतामध्ये फार कमी राहतो. याचे शेवटी कारण हनी सिंह याने सांगितले आहे. हनी सिंह म्हणाला की, मागच्या वर्षी माझ्या मॅनेजरला एक फोन आला. तो फोन सिद्धू मुसेवाला याची हत्या करणाऱ्या गॅंगचा होता. त्यांनी मला थेट जीवे मारण्याची धमकी दिलीये. त्यांच्याकडून काही पैशांची मागणी करण्यात आली.
हनी सिंह म्हणाला, गोल्डी बराड, लॉरेन्स बिश्नोई यांच्या गॅंगने सिद्धू मुसेवालाची हत्या केली. त्याच गॅंगने मला मागच्या वर्षी धमकी दिली. त्यामुळे मी जास्त करून सुरक्षेत अधिक राहतो. ज्यादिवशी गॅंगचा फोन आला होता, त्यावेळी आपण विदेशात असल्याचेही हनी सिंह याने म्हटले. ते पैशांची मागणी करत होते.
पुढे हनी सिंह म्हणाला, याप्रकारानंतर मी सर्व माहिती ही भारतात आल्यानंतर पोलिसांना दिली. माझ्या मॅनेजरने तो कॉल रेकॉर्ड देखील केला होता. पोलिसांच्या तपासामध्ये हे स्पष्ट झाले की, तो फोन गोल्डी बराड याच्याकडूनच करण्यात आला. त्यादिवसानंतर पोलिसांनी आपल्याला सुरक्षा दिल्याचे देखील हनी सिंह याच्याकडून सांगण्यात आले.
आता आपले आयुष्य जिम, घर आणि स्टुडिओपर्यंतच राहिल्याचे हनी सिंह याने म्हटले. पुढे हनी म्हणाला की, त्या धमकीनंतर आपल्याला भारत सोडावा लागला. सार्वजनिक ठिकाणी अगोदरप्रमाणे आता जाता येत नसल्याचेही हनी सिंहने म्हटले. सर्वात जास्त सुरक्षित आपल्याला दुबईत वाटत असल्याचेही हनी सिंह याने म्हटले.