सोनाक्षी सिन्हाच्या कन्यादानावेळी एकीकडे मंत्रांचे पठण तर दुसरीकडे अजान, अखेर झहीर इक्बाल याचा मोठा खुलासा, म्हणाला…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर आता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी सिन्हाच्या कन्यादानावेळी एकीकडे मंत्रांचे पठण तर दुसरीकडे अजान, अखेर झहीर इक्बाल याचा मोठा खुलासा, म्हणाला...
सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 3:29 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्ष एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अगदी खास पद्धतीने यांचा विवाहसोहळा पार पडला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सिव्हिल मॅरेज केले. विशेष म्हणजे सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात देखील पकडला होता. सुरूवातीला सांगितले जात होते की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नाला सिन्हा कुटुंबियांचा विरोध आहे. मात्र, लेकीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा धमाल करताना दिसले. लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये दोघेही आपल्या लग्नाबद्दल बोलताना दिसले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच कन्यादानावर बोलताना झहीर इक्बाल हा दिसला. सोनाक्षी सिन्हा हिचे कन्यादान सुरू असताना नेमके काय घडले हेच आता झहीर इक्बाल याने सोनाक्षी हिच्यासमोरच सांगितले आहे.

झहीर इक्बाल हा म्हणाला की, माझ्या मते आमच्या आयुष्यातील तो क्षण सर्वोत्तम होता. मुळात म्हणजे कन्यादानाला 15 मिनिटे उशीर झाला ठरलेल्या वेळेपेक्षा. कन्यादानासाठी आम्ही बसलो होतो. माझ्या हातामध्ये सोनाक्षीचा हात होता आणि आम्ही प्रार्थना करत होतो. अचानक सोना मला म्हणाली की, तुला काही ऐकू येत आहे का? 

मी सोनाला म्हणालो की, काय?…सोना मला म्हणाली की, अजान सुरू आहे…आणि तो क्षण अत्यंत सुंदर आणि खास होता. आमचे लग्न सुरू होते आणि पंडितजी मंत्र पठण करत होते…त्याचवेळी अजान देखील सुरू होती. माझ्यासाठी आणि सोनाक्षीसाठी खरोखरच तो क्षण खूप मोठा होता…त्यावेळी कन्यादानाची विधी सुरू होती.

आता झहीर इक्बाल याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी लग्नानंतर एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या पार्टीला अनेक मोठे कलाकार पोहोचले होते. हेच नाही तर आपल्याच लग्नाच्या पार्टीमध्ये धमाकेदार डान्स करताना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल दिसले होते, यांच्या लग्नाच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.