अखेर अनन्या पांडे हिच्याकडून ‘तो’ मोठा खुलासा, अभिनेत्रीने मान्य केली ती गोष्ट, म्हणाली, होय..
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अनन्या पांडेचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनन्या पांडे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे ही हार्दिक पांड्या याला डेट करत असल्याचे सातत्याने सांगितले जातंय.

अनन्या पांडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, अनन्या पांडे हिच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. अनन्या पांडे हिच्यासोबत लाईगर चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा हा मुख्य भूमिकेत होता. दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अनन्या पांडे हिच्यावरच फोडण्यात आले. लाईगर चित्रपट हीट ठरला असता तर अनन्या पांडे हिच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले असते. मात्र, तसे होऊ शकले नाहीये.
अनन्या पांडे ही सध्या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आलीये. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना ती दिसत आहे. नुकताच अनन्या पांडे हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने काही मोठे खुलासे केले आहेत. अनन्या पांडे ही पहिल्यांदाच लाईगर चित्रपटाबद्दल बोलताना दिसलीये.
अनन्या पांडे म्हणाली की, मला लाईगर चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नव्हती. त्या स्क्रीप्टमध्ये असे बरेच डायलॉग होते, जे मला एक महिला म्हणून अजिबात आवडले नाही. हेच नाही तर माझे सरळ आहे की, ते डायलॉग बोलू शकणार नाही, मग ते बदलून देत होते. मला एक महिला म्हणून काही गोष्टी अजिबात बोलायच्या नाहीत.
मी जेंव्हाही एका चित्रपटासाठी स्क्रीप्ट वाचते, त्यावेळी मी सर्व विचार करते. लाईगर चित्रपटातील माझे अनेक डायलॉग मी बदलून घेतले. पहिल्यांदाच आता अनन्या पांडे ही लाईगर चित्रपटाबद्दल बोलताना दिसली. लाईगर हा चित्रपट बिग बजेट चित्रपट होता. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठी अपेक्षा नक्कीच होती, मात्र चित्रपट फ्लॉप गेला.
अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांची जोडी प्रेक्षकांना आवडली नसल्याचे बघायला मिळाले. अनन्या पांडे ही फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अनन्या पांडे ही हार्दिक पांड्या याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. अभिनेता आदित्य रॉय कपूर याला अनन्या डेट करत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.