अंकिता लोखंडेची सासू परत लोकांच्या निशाण्यावर, अभिनेत्रीला म्हणाली, समोसे…
अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे फक्त मालिकाच नाही तर चित्रपटातही तिने धमाका केलाय. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता हिने टीव्ही मालिकांमध्ये धमाका केला. विशेष म्हणजे फक्त टीव्ही मालिकाच नाही तर चित्रपटांमध्येही तिने महत्वाच्या भूमिका केल्या. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अंकिता दिसते. अंकिता हिने आपल्या घरी काही दिवसांपूर्वीच खास रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी अनेक कलाकार पोहोचले होते. अंकिता लोखंडे हिने काही वर्ष डेट केल्यानंतर बिझनेसमॅन विकी जैन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हे बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात जोरदार वाद बघायला मिळाला. हेच नाही तर अंकिता लोखंडे हिच्याबद्दल हैराण करणारे भाष्य तिच्या सासूने त्यावेळी केले होते. आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे लाफ्टर शेफमध्ये पोहोचले आहेत. विशेष म्हणजे दोघांचा अंदाज चाहत्यांना आवडताना दिसतोय.
अंकिता हिला स्वयंपाक म्हणावा तसा करता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि तिच्या सासूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे हिने घरातील सर्व सदस्यांसाठी खास समोसे तयार केले आहेत. यावेळी तिने समोसे आपल्या सासूला खाण्यासाठी दिले.
यावर अंकिता लोखंडे ही म्हणते की, मम्मी कसे झाले आहेत समोसे?…सुरूवातीला तिची सासू फक्त मान हालवताना दिसत आहे. पुढे अंकिता परत म्हणते की, मम्मी मान हलवून चांगले नाही झाले म्हणत आहे. परत सासू रंजना जैनला म्हणते ते मम्मा सांगाना कसे झाले..समोसे खूप जास्त टेस्टी आहेत…ही पाजीची कमाल आहे, असे तिची सासू म्हणते…
पुढे अंकिता म्हणते की, पाजीने छान शिकवले आहे…पुढे रंजना जैन म्हणतात की, पाजीने अंकिताला चांगले शिकवले आहे…यानंतर अंकिता पाजीला धन्यवाद देत म्हणते की, पाजी धन्यवाद तुमच्यामुळे मी माझ्या सासरच्या लोकांना काहीतरी तयार करून खाऊ घालू शकत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत अंकिताच्या सासूचा क्लास लावलाय. एकाने लिहिले की, सासू ही सासूच असते. दुसऱ्याने लिहिले की, शेवटी ही सासू आहे, कधीच सुनेचे काैतुक करणार नाही. तिसऱ्याने लिहिले की, काहीही झाले तरीही या रंजना काकू काही बदलणार नाहीत. सध्या अंकिता लोखंडे ही आपल्या सासरच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे.