Akshay Kumar | चित्रपटाचे शूटिंग सोडून चक्क व्हॉलीबॉल मॅच खेळताना दिसला बाॅलिवूडचा खिलाडी कुमार, उत्तराखंडमध्ये अक्षय थेट
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, अक्षय कुमार याच्या या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि त्याचा हा चित्रपट फ्लाॅप (Film flap) गेला. अक्षय कुमार हा सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही दिसला होता. कपिल शर्माच्या शोमध्येही अक्षय कुमार हा पोहचला होता. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. अक्षय कुमार याचे एका मागून एक असे तब्बल सहा चित्रपट हे फ्लाॅप गेले आहेत. अक्षय कुमार याचे चित्रपट (Movie) अजिबात धमाल करू शकत नाहीयेत.
अक्षय कुमार हा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच गोव्याला गेला होता. ज्याचे अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसले. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वी हेरा फेरी 3 या चित्रपटाला करण्यास नकार दिला होता. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. अनेकांनी थेट अक्षय कुमार याने या चित्रपटासाठी तगडी फिस मागितल्याचे म्हटले.
चित्रपट निर्मात्यांनी तेवढी फिस देण्यास नकार दिल्यानेच हेरा फेरी 3 ला अक्षय कुमार याने नकार दिल्याच्या चर्चा होत्या. मात्र, हेरा फेरी 3 चित्रपटाची आपल्याला स्क्रीप्ट आवडली नसल्याचे सांगत अक्षय कुमार याने सर्वांना मोठा धक्का दिला. मात्र, अचानक परत अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला.
View this post on Instagram
अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग हे उत्तराखंड येथे करत आहे. आता अक्षय कुमार याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असून या फोटोमध्ये अक्षय कुमार हा चक्क पोलिसांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. अक्षय कुमार हा 55 वयाचा असून अत्यंत फिट आहे. आपल्या व्यायामाकडे नेहमीच अक्षय कुमार लक्ष देताना दिसतो.
देहरादून येथे अक्षय कुमार पोलिसांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसतोय. अक्षय कुमार याचे हे फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार हा केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी देखील पोहचला होता. आता अक्षय कुमार याच्या आगामी चित्रपटांकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत त्याचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत.