फक्त एकच बस आहे, यायचं तर या… अंबानींच्या घरच्या लग्नातील बॉलिवूड स्टार्सचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Bollywood actors : अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन जामनगरमध्ये सुरू आहे. फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे या फंक्शनसाठी पोहचली आहेत. अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या फंक्शनसाठी बाॅलिवूड कलाकार हे देखील जामनगरमध्ये दाखल झाले आहेत.

फक्त एकच बस आहे, यायचं तर या... अंबानींच्या घरच्या लग्नातील बॉलिवूड स्टार्सचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 12:09 PM

मुंबई : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे गुजरातमधील जामनगर येथे सुरू आहे. या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार तयारी काही महिन्यांपासून सुरू होती. फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे मंडळी ही प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचलीये. या प्री वेडिंग फंक्शनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. प्री वेडिंग फंक्शनसाठी खास पाहुण्याना आमंत्रण आहे. बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार हे या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले आहेत. आता येथील काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

अनंत अंबानी याच्या प्री वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोकही चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अनेकांनी तर बाॅलिवूड कलाकारांची खिल्ली देखील उडवल्याचे या व्हिडीओवरून दिसतंय. हे फक्त आणि फक्त मुकेश अंबानी हेच करू शकतात, असेही अनेकांनी थेट म्हटले.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बाॅलिवूडचे कलाकार हे एकाच बसमधून प्रवास करण्यासाठी निघाले आहेत. कदाचित हे पहिल्यांदाच बघायला मिळतंय की, बाॅलिवूड कलाकार हे एकाच खचाखच भरलेल्या बसमधून आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत आहेत. नेहमीच आलिशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्या कलाकारांना असे पाहून चाहते हे मजाक उडवताना दिसत आहेत.

एकाने हा व्हिडीओ रिशेअर करत लिहिले की, मानले मुकेश अंबानी यांना…दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच हे लग्नाच्या कार्यक्रमाला गेल्यासारखे वाटत आहेत, एकच बस यायचे तर या नाही तर नका…तिसऱ्याने लिहिले की, मस्त आहे हे बघायला, नेहमी लग्झरी गाड्यांमध्ये फिरणारे हे लेकरांसोबत एकाच बसमध्ये सर्वजण प्रवास करत आहेत.

अजून एकाने लिहिले की, सेलिब्रिटी: मला व्हॅनिटी व्हॅन, प्रवासासाठी कार आणि माझ्या क्रू मेंबर्ससाठी बस हवी आहे. अंबानी : बस आहे, जायचं असेल तर सांगा..या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनिल कपूर, रितेश देशमुख, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सैफ अली खान, अनन्या पांडे, करीन कपूर हे कलाकार दिसत आहेत. जवळपास सर्वच कलाकार या लग्नासाठी पोहचले आहेत.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....