ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याची सातत्याने चर्चा आहे. ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबियांचे घर सोडल्याचेही सांगितले जाते.
आता नुकताच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला पोहोचली होती. यावेळी जबरदस्त लूकमध्ये ऐश्वर्या राय ही दिसत आहे. यासोबतच सर्वांच्या नजरा या आराध्या हिच्यावर देखील होत्या. आराध्या देखील जबरदस्त अशा लूकमध्ये अनंत अंबानीच्या लग्नात पोहोचली.
आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांना गळा भेटून त्यांची किस घेताना रेखा या दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे किस्से तर सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे रेखा यांच्यापासून दूर होतात.
दुसरीकडे सून ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे खास नाते आहे. कुठेही ऐश्वर्या राय हिला भेटल्यावर गप्पा मारताना रेखा या दिसतात. अशातच आता अनंत अंबानीच्या लग्नात यांची भेट झाली. यावेळी रेखा यांनी ऐश्वर्या राय हिच्या लूकचे काैतुक केले आहे, किस करत त्यांनी गळा भेट घेतली. रेखा यांनी त्यानंतर अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिला देखील किस केले.
आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करताना देखील दिसत आहेत. काहींनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ऐश्वर्या राय ही सासूला अजिबात घाबरत नाही. दुसऱ्या लिहिले की, ऐश्वर्या राय हिचे असेच सुरू राहिले तर संपत्तीमधील एकही हिस्सा जया बच्चन या ऐश्वर्या राय आणि तिच्या मुलीला देणार नाहीत.