सलमान खानने सर्वांसमोर स्वत:ला चाबकाचे फटके मारले; सेटवरील सगळे पाहतच बसले

सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान स्वत:लाच चाबकाचे फटके मारत असल्याचं दिसत आहे. पण हे पाहून सेटवरील सर्वजण हैराण होतात. पण सलमानने स्वत:ला चाबकाचे फटके का मारून घेतले?

सलमान खानने सर्वांसमोर स्वत:ला चाबकाचे फटके मारले; सेटवरील सगळे पाहतच बसले
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 8:36 PM

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या बिष्णोईच्या प्रकरणावरून चर्चेत आहे. तसेच त्याच्या खाजगी आयुष्यातील काही प्रसंगामुळेही तो चर्चेत असतो. सलमान खान 27 डिसेंबरला 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमानचे चाहतेही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सलमानचा व्हिडीओ व्हायरल 

दरम्यान सलमान खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्वतःला चाबकाचे फटके मारताना दिसत आहे आणि त्याच्या फिल्मच्या सेटवर. सलमानने केलेले हे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

सलमान खान इन्स्टाग्रामवर नेहमीच ॲक्टिव्ह असतो. तो त्याच्या चित्रपट आणि आयुष्याशी संबंधित अनेक अपडेट्स शेअर करत असतो. काही वर्षांपूर्वी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो स्वत:ला फटके मारताना दिसत होता. सलमानचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले. होते. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

सलमानने स्वतःला चाबकाचे फटके का मारले?

सलमान खानने शेअर केलेला व्हिडिओ 2019 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ‘दबंग 3’ चित्रपटाच्या सेटवरील होता. व्हिडिओमध्ये सलमान खान पहिल्यांदा पोतराज समाजाच्या लोकांशी बोलताना दिसत आहे. सलमान पोतराज समाजातील लोकांना स्वत:ला फटके मारताना पाहतो, त्यानंतर तो स्वतःही असे करण्याची इच्छा व्यक्त करतो.

तसेच सलमान खान पोतराजाला चाबकामधून येणाऱ्या आवाजाबद्दलही विचारतो. तेव्हा तो सलमानला सांगतो की या चाबकाला जेव्हा जोरात मारतो तेव्हा त्याच्यातून हा आवाज येतो. हे पाहून सलमानही त्याच्याकडून तो चाबूक घेऊन स्वत:वर तो प्रयोग करतो.

सलमान आधी त्या पोतराजाला त्या चाबकाबद्दल आणि ते कसं पकडायचं किंवा फटके मारून घेताना कशापद्धतीने त्याचा वापर करायचा असं सगळं विचारून तो खरोखरच चाबकाचे फटके मारून घेतो. जेव्हा सलमान खान चाबकाचे फटके मारून घेतो तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं.सेटवरील सर्वजन अगदी थक्क होऊन पाहत राहतात.

सलमानचे धाडस पाहून लोकांनी वाजवल्या टाळ्या

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सलमान खान प्रथम स्वत:च्या हातावर मारतो आणि म्हणतो की चाबकाचा आवाज येत नाही. यानंतर सलमान खानने चाबूक धरला आणि पूर्ण ताकदीने स्वतःला मारायला सुरुवात करतो आणि त्याला अपेक्षित असणारा आवाजही त्या चाबकातून येतो.

शेवटी सलमान चाबूक पोतराजाला परत करतो आणि त्याच्याशी हातही मिळवतो तसेच त्यांच्यासोबत फोटोही काढतो. दरम्यान सलमानने केलेलं धाडसं पाहून गर्दीतील लोकही टाळ्या वाजवायला लागतात. हा व्हिडीओ शेअर करताना सलमानने लिहिले होते की, “त्यांच्या वेदना शेअर करण्यात आणि अनुभवण्यात एक वेगळीच भावना आहे. “बच्चा पार्टी, हे कधीही स्वतःवर करून पाहू नका.” असं लिहित त्याने या लोकांबद्दलचे प्रेम व्यक्त केलं होतं.

सलमान खान वर्कफ्रंट सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर सलमान लवकरच सिकंदरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा सिकंदर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जाते.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...