दीपिका कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दीपिका कक्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. दीपिका कक्कर हिने इस्लाम धर्म स्वीकारत शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर लग्नानंतर अभिनयापासूनही दीपिका कक्कर दूर आहे. मात्र, दीपिका कक्कर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. व्लॉगच्या माध्यमातून दीपिका कक्कर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. दीपिका कक्कर कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.
दीपिका कक्कर हिने व्लॉगिंग सुरू करून आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. याचेच सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी दीपिका कक्कर हिच्याबद्दल बोलताना शोएब इब्राहिम म्हणाला की, एक चांगली व्यक्ती, एक चांगली अभिनेत्री आणि बेस्ट आई दीपिका कक्कर आहे. ती आपल्या मुलाला अधिक वेळ देण्याचा प्रयत्न कायमच करते, त्याची काळजी घेते.
यावेळी शोएब इब्राहिम याचे बोलणे ऐकून दीपिका कक्कर म्हणाली की, मला प्रत्येक गोष्टीमध्ये शोएब इब्राहिमने सपोर्ट केलाय. ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते, त्याचप्रमाणे माझ्या मागे शोएब आहे. हे बोलताना दीपिका कक्कर ही रडताना दिसतंय. बोलताना डोळे पुसताना दीपिका कक्कर ही दिसत आहे.
जुलै 2023 मध्ये दीपिका कक्कर हिने मुलाला जन्म दिलाय. रूहान नाव दीपिका कक्कर हिने मुलाचे ठेवलंय. दीपिका कक्कर ही व्लॉगिंगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेक खाद्यपदार्थ तयार करताना कायमच दीपिका कक्कर दिसते. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जोरदार फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
दीपिका कक्कर हिचे शोएब इब्राहिमसोबतचे हे दुसरे लग्न आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका कक्कर हिने मोठा खुलासा केला होता. दीपिका कक्कर हिने थेट म्हटले होते की, मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी इस्लाम धर्म का स्वीकारला हे सांगणार नाहीये. तो माझा एकदम खासगी विषय आहे. मला त्यावर अजिबात खुलेपणाने बोलायचे नसल्याचे दीपिकाने म्हटले.