Rakhi Sawant | राखी सावंत हिने केले ‘या’ धर्माबद्दल अत्यंत मोठे भाष्य, विमानतळावरच महिलेने घेतला अभिनेत्रीसोबत पंगा, थेट म्हणाली, काय कमी
राखी सावंत ही नेहमीच चर्चेत आहे. राखी सावंत हिच्या खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळत आहे. राखी सावंत हिच्यावर तिचा पती आदिल दुर्रानी याने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आदिल दुर्रानी याने केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : राखी सावंत हिच्या पर्सनल लाईफमध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने काही महिन्यांपूर्वीच आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. इतकेच नाही तर राखी सावंत हिने आपल्या लग्नाची गोष्टी काही दिवस सर्वांपासूनच लपवून ठेवली. मात्र, अचानकपणे राखी सावंत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण लग्न (Marriage) केल्याचे जाहिर केले. इतकेच नाही तर तिने यावेळी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म स्वीकारला.
काही दिवस राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांचा सुखाचा संसार दिसला. मात्र, त्यानंतर राखी सावंत हिने सर्वांनाच मोठा धक्का देत आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यामधील वाद थेट कोर्टात जाऊन पोहचला. आदिल दुर्रानी याला काही महिने थेट जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली.
काही दिवसांपूर्वीच आदिल दुर्रानी हा जेलबाहेर आलाय. आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, आदिल दुर्रानी हा आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचे सांगत. राखी सावंत थेट उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली. यावेळी राखी सावंत हिने अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केले.
विशेष म्हणजे राखी सावंत हिने आपल्या आयुष्यातील पहिला उमराह केलाय. आता नुकताच उमराह करून राखी सावंत ही भारतामध्ये परत आलीये. विशेष म्हणजे उमराह करून आल्यानंतर विमानतळावर राखी सावंत हिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी लोक हार आणि फुले घेऊन राखी सावंत हिच्या स्वागतासाठी गेले.
लोक राखी सावंत हिचे स्वागत करत असतानाच एक महिला गर्दीमधून मोठ्याने ओरडताना दिसली. ही महिला राखी सावंत हिला म्हणाली की, हिंदू धर्मामध्ये काय खराब गोष्ट होती, जे तू इस्लाम धर्म स्वीकार केला? हे ऐकल्यावर राखी सावंत ही दोन मिनिटे शांत झाली आणि तिला नेमके काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते.
यावर राखी सावंत ही म्हणाली की, माझा पती मुस्लीम आहे आणि मी त्यामुळे लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. हिंदू धर्मामध्ये काहीच खराबी नाहीये. मी निकाह केला आणि इस्लाम धर्म स्वीकारला. आता राखी सावंत हिचा हाच व्हि़डीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना देखील दिसत आहेत.