‘आईने झूठें हैं, सच्ची तस्वीरे हैं!’, घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीला ओळखणंही मुश्किल!

सध्या मालिका विश्वात टॉप ट्रेंडवर असलेल्या आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारत असलेली रुपाली.... अधून मधून ती आपल्या सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. तिचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या फोटोत ही तीच रुपाली भोसले आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडल्यावाचून राहत नाही. (Rupali Bhosale Viral photo)

'आईने झूठें हैं, सच्ची तस्वीरे हैं!', घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीला ओळखणंही मुश्किल!
संजना अर्थात रुपाली भोसले...
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 8:26 AM

मुंबई : सोशल मीडियावर विविध ट्रेंड येत असतात. कधी अमुक एका कपड्यावरचा फोटो तरी याच अमुक एका वयातला फोटो… लाखो नेटकरी हे ट्रेंड फॉलोही करत असतात. आता हे ट्रेंड नेटकरी फॉलो करतात म्हटल्यावर चित्रपटसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्रीही आपले फोटो पोस्ट करुन रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवत असतात. असाच एक बालपणीचा फोटो व्हायरल झालाय, आताची ग्लॅमरस अभिनेत्री जिने आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरात हक्काचं स्थान मिळवलंय, त्या आई कुठे काय करते मालिकेतील संजना अर्थात रुपाली भोसले हिचा…! (Rupali Bhosale) रुपालीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. प्रेक्षकांना हा फोटो ओळखणंही मुश्किल झालंय. (Aai kuthe kay krte Fame Actress Rupali Bhosale Viral photo)

अभिनेत्रीला ओळखणं मुश्किल

सध्या मालिका विश्वात टॉप ट्रेंडवर असलेल्या आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारत असलेली रुपाली…. अधून मधून ती आपल्या सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. तिच्या अदा पाहून प्रेक्षकही तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. पण तिचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. रुपाली कदाचित 15 ते 20 वर्षांची असेल, तेव्हाची हा फोटो आहे. या फोटोत ही तीच रुपाली भोसले आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडल्यावाचून राहत नाही.

रुपाली भोसलेची अभिनय कारकीर्द

‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.

‘बिग बॉस मराठी’मुळे ओळख

रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर परागसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती.

रुपाली बिग बॉसच्या घरात आपल्या गेमबाबतही तितकीच फोकस्ड होती. महेश मांजरेकर यांनी कान टोचल्यानंतर रुपाली अधिक स्ट्राँग झाल्याचं चाहत्यांनी पाहिलं. मात्र अंतिम फेरीपासून काही पावलं दूर असतानाच तिचं अनपेक्षित एलिमिनेशन झालं. बिग बॉसच्या घरात असताना रुपालीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दुखरी नस उलगडून दाखवली होती. मात्र जुनं विसरुन नव्या आयुष्याची ओढ असल्याची सकारात्मकता तिच्या डोळ्यात दिसते. तसंच, सख्खा भाऊ संकेतविषयीचं तिचं प्रेमही वारंवार दिसून आलंय.

‘आई कुठे काय करते!’त संजनाची भूमिका लोकप्रिय

दरम्यान, ‘आई कुठे काय करते!’ मालिकेतील संजनाची भूमिकाही रुपालीकडे अनपेक्षितपणे चालून आली. अभिनेत्री दीपाली पानसरे आधी संजनाची भूमिका साकारत होती. मात्र लॉकडाऊनच्या काळात मालिकेला ब्रेक लागला. त्यानंतर संजना बदलली. दीपालीऐवजी रुपालीची वर्णी लागली. अनिरुद्धवरील प्रेम, नव्या संसाराची ओढ, अरुंधतीची इर्षा अशी संजना दीक्षितच्या भूमिकेतील ग्रे शेड रुपालीने नेमकी पकडली आहे. त्यामुळेच संजनाचा राग येतानाच तिची हतबलताही प्रेक्षकांना जाणवते.

(Aai kuthe kay krte Fame Actress Rupali Bhosale Viral photo)

हे ही वाचा :

Photo : ‘तयारी झाली सुरु…’, संजना अर्थात रुपाली भोसले लग्न बंधनात अडकणार?

Rupali Bhosale | ‘बिग बॉस’मधील टशन ते टीव्हीवरची व्हिलन, बघा संजना रिअल लाईफमध्ये ‘कुठे काय करते!’

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.