Aakash Thosar याची सह्याद्री भटकंती; धबधब्याखाली स्वतः बनवलेल्या भज्यांवर मारला ताव

आकाश ठोसर याने मारला स्वतः बनवलेल्या भज्यांवर ताव; निसर्गाच्या सानिध्यात बनवली गरमागरम बटाटा भजी... सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

Aakash Thosar याची सह्याद्री भटकंती; धबधब्याखाली स्वतः बनवलेल्या भज्यांवर मारला ताव
| Updated on: Jul 29, 2023 | 4:00 PM

मुंबई | 29 जुलै 2023 : पावसाळा म्हटलं की धबधबे पर्यटकांनी फुलून निघतात. प्रत्येक जण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मित्र किंवा कुटुंबासोबत लांब फिरायला जातात. ‘सैराट’ फेम आकाश ठोसर देखील सह्याद्री भटकंतीसाठी निघाला आहे. खुद्द आकाश याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता निसर्गाच्या सानिध्यात रमला आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने धबधब्याखाली मस्तपैकी गरम-गरम भज्यांवर ताव मारला आहे. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आकाशच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.

व्हिडीओमध्ये सुरुवातील धबधब्याच्या वाहत्या पाण्यात आकाश बटाटी स्वच्छ धुवताना दिसत आहे. त्यानंतर एका आकाश याने स्वतःचा धबधब्याखाली बटाटा भजी तयार केली आहेत. भजी तयार झाल्यानंतर भजी-पावावर आकाश याने ताव मारला.. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘सुख..’ असं लिहिलं आहे. शिवाय अनेक चाहत्यांनी आकाश याच्या व्हिडीओवर कमेंट करत ‘सुख म्हणजे हेच…’ असं लिहिलं आहे.

 

 

अभिनेत्याच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी, ‘सुंदर आयुष्यातील खरी मजा’, ‘सह्याद्री आणि आकाश ठोसर’, ‘बिर्याणी वरून डायरेक्ट बटाटा भजी’, ‘भारी एकदम…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर आकाश याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आकाश याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याला ‘सैराट’ सिनेमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘सैराट’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. एवढंच नाही तर, आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

आता आकाश ‘बाल शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती रवी जाधव यांनी दिली आहे. आता चाहते देखील आकाश याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत..

आकाश सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याची चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आकाश याच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतो. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आकाश कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.