Aakhri Sach | घरातील सदस्यच होता व्हिलेन? बुराडी कांडवर आधारित सीरिजमध्ये मोठा खुलासा

अभिनेत्री तमन्ना भाटियाची वेब सीरिज सध्या चर्चेत आली आहे. 'आखिरी सच' असं या सीरिजचं नाव असून बुराडी कांडवर ती आधारित आहे. या सीरिजची कथा तिसऱ्या एपिसोडमध्ये अत्यंत नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे.

Aakhri Sach | घरातील सदस्यच होता व्हिलेन? बुराडी कांडवर आधारित सीरिजमध्ये मोठा खुलासा
Tamannah BhatiaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 10:37 PM

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाची ‘आखिरी सच’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजची चर्चा यासाठी होतेय कारण ती बहुचर्चित बुराडी कांडवर आधारित आहे. या सीरिजमध्ये अत्यंत नाट्यमय पद्धतीने त्या घराची कहाणी दाखवण्यात आली आहे, जिथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्या केली होती. ही नेमकी आत्महत्या होती की हत्या त्याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या तथ्यांच्या आधारावर विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. आखिरी सच या वेब सीरिजच्या आधी बुराडी कांडवर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक माहितीपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव हाऊस ऑफ सिक्रेट्स असं होतं. आता ‘आखिरी सच’च्या निमित्ताने पुन्हा एकदा ही केस चर्चेत आली आहे.

तिसऱ्या एपिसोडमध्ये काय दाखवलं?

या सीरिजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये कथा थोडी पुढे सरकते, मात्र ती एका अशा गूढ वळणावर थांबते, ज्यावर विश्वास ठेवणं कोणासाठीही कठीण असेल. सीरिजमध्ये या केसचा तपास सुरू असून त्यादरम्यान बरेच लोकांवर संशय निर्माण केला जातो. यामध्ये घरातील एका सदस्याचाही समावेश आहे. ‘आखिरी सच’मध्ये अभिनेता अभिषेक बॅनर्जी जी भूमिका साकारतोय, ती फार रहस्यमयी आहे. जसजशी सीरिजची कथा पुढे सरकतेय, तसतसं अभिषेकच्या वागणुकीत बदल होताना दिसतंय. त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की 11 लोकांच्या मृत्यूप्रकरणाशी त्याचा नक्कीच कोणता तरी संबंध आहे.

सीरिजच्या कथेतून हळूहळू एक-एक गोष्ट उलगडत जातेय आणि प्रत्येक घटनाक्रमातून ठराविक संदेश मिळत आहेत. मात्र आतासुद्धा क्राइम ब्रांच पूर्णपणे संभ्रमात आहे. या खटल्याचं मूळ त्यांनाही अजून सापडलं नाही. त्यासाठी या एपिसोडच्या पुढच्या एपिसोडची प्रतीक्षा करावी लागेल.

हे सुद्धा वाचा

‘आखिरी सच’ ही वेब सीरिज 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाली. या सीरिजचे आतापर्यंत तीन एपिसोड्स प्रदर्शित झाले आहेत आणि इतर तीन एपिसोड्स एक-एक करून दर शुक्रवारी प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये तमन्ना भाटियासोबतच अभिषेक बॅनर्जी, कृती विज, शिविन नारंग, सलीम सिद्दिकी, दानिश इकबाल आणि फिरदौस हसन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.