मुंबई, 17 जुलै 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याही सेलिब्रिटीसोबत शमिताचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. आज वयाच्या ४४ व्या वर्षी सर्वकाही असून देखील अभिनेत्री एकटं आयुष्य जगत आहे. शमिता ‘बिग बॉस’मध्ये देखील अभिनेत्री दिसली. घरातील दमदार स्पर्धकांपैकी शमिता एक होती. घरात शामिता हिचं नाव अभिनेता राकेश बापट याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. दोघांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. पण नातं अधिक काळ टिकू शकलं नाही.
राकेश बापट याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर शमिता हिचं नाव टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आमिर अली याच्यासोबत जोडण्यात आलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अमिर याने शमिता हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शमिता आणि आमिर अली यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
आमिर अली म्हणाला, ‘मी जेव्हा कोणासोबत बाहेर जातो, तेव्हा माझ्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात. मी सिंगल आहे याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही माझं नाव कोणासोबतही जोडाल. मला आठवतं की मी माझ्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये भारतीय संघ कोणाचा तरी वाढदिवस साजरा करत होता.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा माझी एक महिला मैत्रीण मला भेटली. तिला सोडण्यासाठी मी बाहेर आलो. अचानक दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राने मला कॉल केला आणि सांगितले की तू तिला (शमिता शेट्टी) डेट करत आहेस आणि तिने मला यूट्यूब लिंक देखील पाठवली.’
‘मी स्पष्टपणे सांगत आहे की, मी सिंगल आहे. मी कोणाला डेट करत नाही. आधी मला माझ्या आईची भीती वाटायची. अता मला एका लहान मुलांप्रमाणे आईची काळजी घ्यावी लागते. मी आणि शमिता एकत्र सिनेमे पाहयचो. पण सतत रंगत असलेल्या रिलेशनशिपच्या चर्चांनंतर सर्वकाही बंद झालं आहे. आता या सर्व गोष्टींबद्दल मी जास्त विचार करत नाही. ‘
आमिर अली याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, आमिर अली याचं अभिनेत्री संजीदा शेख हिच्यासोबत घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजीदा हर्षवर्धन राणे याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर देखील आमिर याने मोठं वक्तव्य केलं आहे.
पहिल्या पत्नीच्या नात्यावर रंगणाऱ्या चर्चांबद्दल अभिनेता म्हणाला, ‘हे एक स्वतंत्र्य जग आहे. मला असं वाटतं तिने आनंदी राहावं. तिला जे हवं ते तिने करावं. मला याबद्दल काहीही बोलयचं नाही. कोण कोणाला डेट करत आहे मला माहिती नाही…’ सध्या सर्वत्र आमिर अली याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.