Aamir Ali | “घटस्फोटानंतर आयुष्याचा सर्वोत्तम काळ सुरू”; अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा

एका मुलाखतीत त्याने घटस्फोटानंतर संजीदाशी कोणताच संपर्क नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आमिर आणि संजीदाने बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्न केलं होतं. 2021 मध्ये या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर मुलीचं पालकत्व संजीदाला मिळालं.

Aamir Ali | घटस्फोटानंतर आयुष्याचा सर्वोत्तम काळ सुरू; अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा
Aamir AliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 3:17 PM

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोड्यांमध्ये अभिनेता आमिर अली आणि संजीदा शेख यांचा आवर्जून समावेश होतो. मात्र ज्यावेळी या जोडीने विभक्त होत असल्याचं जाहीर केलं, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्काच बसला. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर दोन वर्षांपर्यंत दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा आमिरला घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याचं ऐकून चाहते अवाक् झाले. आमिर आणि संजीदाने बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 2021 मध्ये या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर मुलीचं पालकत्व संजीदाला मिळालं.

आमिर अली सध्या त्याच्या आगामी ‘द ट्रायल : प्यार, कानून, धोखा’ या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने घटस्फोटाविषयी वक्तव्य केलं. आमिरने सांगितलं की तो सध्या खूप खुश आहे आणि आयुष्याचा सर्वांत चांगला काळ जगत आहे. याशिवाय त्याने अप्रत्यक्षपणे पूर्व पत्नी संजीदालाही तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आमिर म्हणाला, “मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास, मी माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगला काळ व्यतीत करत आहे.”

हे सुद्धा वाचा

आमिर आणि संजीदा यांना आयरा ही मुलगी आहे. एका मुलाखतीत त्याने घटस्फोटानंतर संजीदाशी कोणताच संपर्क नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “एखादं नातं कितीही परफेक्ट दिसत असलं तरी कधी कधी ते टिकत नाही. संजीदाला खूश ठेवणारा पार्टनर तिला मिळो. फक्त प्रेमासाठी दोन जणांनी एकत्र यावं. जर एकत्र येण्याचं कारण प्रेमाशिवाय दुसरं कोणतं तरी असेल तर समस्या तिथूनच निर्माण होतात”, असं आमिर म्हणाला होता.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर पुढे म्हणाला होता, “माझ्यासाठी तो काळ खूप कठीण होता. घटस्फोटानंतर मी पूर्णपणे खचलो होतो. माझा स्वभाव अत्यंत उत्साही आहे आणि मी कधीच हार मानत नाही. मात्र संजीदाशी विभक्त झाल्यानंतर मला सावरायला काही वेळ गेला. मी पुन्हा पहिल्यासारखा झालोय, याचं मला समाधान आहे. मी कोणासाठीही वाईट विचार करत नाही आणि संजीदालाही तिचा आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे.”

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....