आमिर खानने मुलगा आझादसह केली बाप्पाची आरती; पहा खास फोटो

| Updated on: Sep 09, 2024 | 10:29 AM

अभिनेता आमिर खानने त्याच्या कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा केला. बहीण निखत आणि मुलगा आझाद यांच्यासोबत मिळून त्याने गणपती बाप्पाची पूजा आणि आरती केली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आमिर खानने मुलगा आझादसह केली बाप्पाची आरती; पहा खास फोटो
आमिर खान आणि त्याचा मुलगा आझाद खान
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानने बहीण निखत खान आणि भावोजी संतोष हेगडे यांच्यासोबत गणेशोत्सव साजरा केला. मुंबईतल्या निवासस्थानी आमिर खानचं कुटुंब गणेशोत्सवासाठी एकत्र आलं आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आमिर खान त्याची बहीण आणि इतर कुटुंबीयांसोबत गणपतीची पूजा-आरती करताना दिसत आहे. यावेळी आमिरने निळ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. मुलगा आझादसोबत तो गणपती बाप्पाची आरती करताना या फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये आमिरच्या मागे गुलाबी रंगाच्या साडीत दिसणारी महिला त्याची बहीण निखत खान आहे.

निखतने संतोष हेगडे यांच्याशी लग्न केलंय. ते पुण्यातील एका फार्मास्युटिकल कंपनीचे सीईओ होते. आता ते निवृत्त झाले आहेत. राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र संवर्धन याठिकाणी ट्रिपदरम्यान दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. सुरुवातीला ते पुण्यातच राहिले. मात्र संतोष निवृत्त झाल्यानंतर ते मुंबईत शिफ्ट झाले. निखतला अभिनयात करिअर करता यावं यासाठी ते पुण्याहून मुंबईला राहायला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात निखतने छोटीशी भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा

आमिर खानच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, तो सध्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटासाठी काम करतोय. यामध्ये तो अभिनेत्री जिनिलिया देशमुखसोबत भूमिका साकारणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. येत्या 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला होता. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी त्याने चित्रपटांमधून निवृत्त होण्याचंही ठरवलं होतं. मात्र कुटुंबीयांच्याच आग्रहास्तव त्याने अभिनयक्षेत्रात काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

“माझी मुलं जेव्हा लहान होती, जेव्हा आयरा 3, 8, 12 वर्षांची होती.. तेव्हा मी तिच्यासोबत कधीच नव्हतो. कधीकधी मी त्यांच्यासोबत किंवा माझ्या आईसोबत वेळ घालवायतो, पण मानसिकरित्या मी तिथे कधीच उपस्थित नसायचो. माझ्या डोक्यात सतत काम आणि कामाचेच विचार असायचे. या जाणीवेमुळे मी अधिक तणावात गेलो. अखेर यातून बाहेर पडण्यासाठी मला थेरपीचा आधार घ्यावा लागला”, असं आमिरने एका मुलाखतीत सांगितलं होतं.