सलमान खान असताना आमिर कधीच नाही करु शकत तिसरं लग्न? कारण…

Salman Khan - Aamir Khan: 'आमिरचे हात - पाय बांधून...', आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य, भाईजान असताना आमिर कधीच करु शकत नाही तिसरं लग्न, कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान - आमिर यांची चर्चा...

सलमान खान असताना आमिर कधीच नाही करु शकत तिसरं लग्न? कारण...
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 2:49 PM

अभिनेता आमिर खान त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. पण अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. अभिनेता लवकरच ‘सितारे जमीन पर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या आमिर त्याच्या आगामी सिनेमामुळे तर चर्चेत आहेच, पण नुकताच झालेल्या एका पॉटकास्ट शोमध्ये अभिनेत्याने तिसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं. आमिर खान याने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या ‘चॅप्टर 2’ या पॉडकास्टमध्ये स्वतःच्या तिसऱ्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं. पण अभिनेता सलमान खान असताना आमिर खान याचं तिसरं लग्न कधीच होऊ शकत नाही.

‘मी असताना आमिर खानचं तिसरं लग्न कधीच होऊ शकत नाही…’ असं खुद्द सलमान खान एका जुन्या मुलाखतीत म्हणाला होता. सांगायचं झालं तर, सलमान खान आणि आमिर खान चांगले मित्र आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

2017 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत आमिर खान याने सलमानच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सलमान खान याचे हात – पाय बांधून त्याला सप्तपदी घ्यायला लावेल…’ असं वक्तव्य आमिर खान याने केलं होतं. तर आमिर खानच्या या वक्तव्यावर सलमान खानने देखील प्रतिक्रिया दिली होती.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, सलमान खान 2017 मध्ये म्हणाला होता की, ‘हो मी एका ठिकाणी वाचलं होतं, मी लग्न करावं अशी आमिरची इच्छा आहे. त्यासाठी तो माझे हात-पाय बांधेल. पण मी फक्त एवढंच सांगेल की, मी त्याचे हात – पाय बांधेल म्हणजे आमिर तिसरं लग्न करणार नाही…’ असं सलमान खान म्हणाला होता.

तिसऱ्या लग्नाबद्दल आमिर खानचं वक्तव्य

रिया हिने आमिर खान याला तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, ‘आता मी 59 वर्षांचा आहे… मला नाही वाटत की मी आता तिसरं लग्न करेल. मला कठीण वाटत आहे. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या जवळ आलो आहे… मला माझी भावंड, मुलं आहेत. त्यांच्यासोबत मी फार आनंदी आहे… एक उत्तम व्यक्ती होण्याचा आता मी प्रयत्न करत आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न 18 एप्रिल 1986 मध्ये रिना दत्ता हिच्यासोबत झालं. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्याने 2005 मध्ये किरण राव सोबत लग्न केलं. पण अभिनेत्याचं दुसरं देखील टिकलं नाही. 2021 मध्ये आमिर – किरण यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोट झाला असला तरी अभिनेता दोन्ही कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.