
मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान कायम कोणत्या न कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील आयरा एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आयरा खान हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने स्वतःच्या मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर आयरा हिने लोकांना त्यांच्या आव्हानांबद्दल आणि अनुभवांबद्दल विचारलं आहे.
व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘मला एक फनी व्हिडीओ करायचा होता. पण माझे मित्र म्हणाले जेव्हा तुझा मृत्यू होईल तेव्हा तुझ्या कबरीवर पिपल प्लीजर असं लिहू…’ पिपल प्लीजर याचा अर्थ फार कोणाला माहिती नाही. पिपल प्लीजर म्हणजे सहज कोणाच्याही बोलण्याला होकार द्यायचा. स्वतःचं काहीच मत नसलेल्या व्यक्तींना देखील पिपल प्लीजर म्हणतात…
पुढे आयरा म्हणाली, ‘मी कधीच माझ्या हेयर स्टायलिस्टला देखील सांगू शकली नाही की, मला माझे केस किती कापायचे आहेत. मी तुम्हाला विचारते तुम्हाला कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागतो का? मला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तुम्हाला काय वाटतं. मी लवकरच माझा पॉडकास्ट सुरु करणार आहे आणि त्यामध्ये खास गेस्ट असणार आहेत…’ असं देखील आयरा म्हणाली.
सांगायचं झालं तर, आयरा आत्महत्या आणि डिप्रिशन यांसारख्या गोष्टींचा सामना करणाऱ्या लोकांची मदत करते. स्वतः आयरा हिने देखील डिप्रेशनचा सामना केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच आयरा हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आयरा आणि नुपूर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयरा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील आयरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आयरा कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते.