Aamir Khan च्या लेकीची ‘लग्न पत्रिका’ तयार, पाहुण्यांना निमंत्रित करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल
Ira Khan Wedding Invitation : अभिनेता आमिर खान याच्या लेकीची 'लग्न पत्रिका' पाहून व्हाल हैराण... प्रत्येकाला पाठवली वेगळ्या अंदाजात लग्न पत्रिका, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा खान हिच्या लग्नाची चर्चा...
मुंबई | 8 डिसेंबर 2023 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, लेकीच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर खान याची लेक आयरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील आयरा खान हिच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. आयरा खान हिच्या लग्नाची पत्रिका तयार झाली आहे. आयरा खान हिने अनोखी शक्कल लढवत मित्रांना लग्नाची पत्रिका पाठवली आहे. सध्या सर्वत्र आयरा खान हिच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा रंगत आहे. आयरा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या आयरा हिने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आयरा हिने मित्रांना लग्न पत्रिका पाठवली आहे आणि लग्नाला येण्यासाठी खास पद्धतीत निमंत्रण दिलं आहे. आयरा हिने तिच्या मित्र परिवाराला पझल पाठवलं आहे. आयरा हिची लग्न पत्रिका पाहून मित्र देखील हैराण झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
लग्नाची पत्रिका वेगळ्या आणि हटके अंदाजात पाठवत आयरा आणि नुपूर शिखरे याने मित्रांना लग्नाला बोलावलं आहे. आयरा आणि नुपूर यांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. आता खान आणि शिखरे कुटुंबिय लग्नाच्या तयारीला लागले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.
होणाऱ्या जावायाबद्दल कायम म्हणाला आमिर खान?
‘नुपूर चांगला मुलगा आहे. जेव्हा आयरा डिप्रेशनमध्ये होती, तेव्हा माझ्या मुलीसाठी नुपूर खंबीर पणे उभा राहिला. तो उत्तम जोडीदार आहे आणि दोघांना एकत्र पाहून मला प्रचंड आनंद होतो.आयरा हिने नुपूर सारख्या मुलाची निवड केली म्हणून मी आनंदी आहे. नुपूर, आयरा हिला कायम आनंदी ठेवेल. ’ 3 जानेवारी 2024 रोजी आयरा लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती देखील आमिर खान याने दिली.
आयरा आणि नुपूर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा कायम नुपूर याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आयरा अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आयरा हिच्या पोस्टवर चाहते कायम लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.