Aamir Khan : लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यानं आमीर खान निराश, वितरकांना मोठं नुकसान, 4 दिवसांत 38 कोटी कमावले
लाल सिंह चड्डा बहुप्रतीक्षित चित्रपट होतं. परंतु, आमीर आणि करीना यांच्या वक्तव्यामुळं सोशल मीडियानं बहिष्कार अभियान चालविलं.
आमीर खानचा चित्रपट लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यानं तो संकटात सापडलाय. वितरकांना (Distributor) या चित्रपटामुळं मोठं नुकसान सहन कराव लागलंय. त्यांनी चित्रपट निर्मात्यास मोबदला देण्याची मागणी केली. आमीर खान स्वतः या चित्रपटाचा निर्माता आहे. प्राप्त माहितीनुसार, चित्रपट फ्लॉप झाल्याची जबाबदारी आमीर खाननं स्वतः घेतली आहे. परंतु, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बॉलिवूड (Bollywood) हंगामा रिपोर्टनुसार, आमीर खान आणि त्यांची माजी पत्नी किरण राव (Kiran Rao) यांच्या मित्रानं सांगितलं की, आमीर खाननं लाल सिंह चड्डासाठी खूप मेहनत घेतली होती. आमीर खान यांच्या इच्छा होती की, बेस्ट व्हर्जन प्रेक्षकांसमोर आणतील. परंतु, चित्रपट रिलीज झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांनी आमीर खानची निराशा केली. लाल सिंह चड्डाला झालेल्या नुकसानीनंतर वितरकांनी मोबदल्याची मागणी केली. या चित्रपटामुळं खूप नुकसान झाल्याचं वितरकांचं म्हणणं आहे. निर्माते वितरकांना नुकसान भरपाई देण्याच्या तयारीत आहेत.
चार दिवसांत कमावले 38 कोटी
लाल सिंह चड्डा बहुप्रतीक्षित चित्रपट होतं. परंतु, आमीर आणि करीना यांच्या वक्तव्यामुळं सोशल मीडियानं बहिष्कार अभियान चालविलं. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. 180 कोटी बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यात फक्त 38 कोटी 21 लाख रुपयांची कमाई करू शकला. आमीर खानच्या आधीच्या चित्रपटांनी ही कमाई एका दिवसात केली आहे. लाल सिंह चड्डा या चित्रपटाने रविवारी 10 कोटी 5 लाख रुपयांचा व्यवसाय केला. त्यापूर्वी शनिवारी 8 कोटी 75 लाख, शुक्रवारी 7 कोटी 26 लाख आणि गुरुवारी 11 कोटी 70 लाखांचा व्यवसाय केला. आता व्यवसाय जास्त होण्याची शक्यता फार कमी आहे.
सैन्यांचा अपमान करण्याच्या आरोपाची तक्रार
लाल सिंह चड्डा चित्रपटावरून दिल्लीतील वकीलानं पोलीस आयुक्त संजय अरोडा यांच्याकडं आमीर खान आणि अन्य जणांविरुद्ध तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आमीर खान यांनी लाल सिंह चड्डा चित्रपटातून भारतीय सेनेचा तसेच हिंदू समाजाचा अपमान केला आहे. वकील विनीत जिंदल यांनी तक्रारीत आपत्तीजनक दृश्य असल्याचंही म्हटलं आहे. आमीर खान, पॅरामाऊंट पिक्चर्स आणि चित्रपट निर्माता अद्वैत चंदन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.