Aamir Khan : 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत काम करणार आमिर खान; अफेअरपासून लग्नाच्याही होत्या चर्चा

अभिनेता आमिर खान लवकरच चित्रपटांमध्ये परतणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने कामातून ब्रेक घेतला होता. आता आगामी चित्रपटात तो एका अशा अभिनेत्रीसोबत काम करणार आहे, जिच्यासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर किरणसोबतच्या घटस्फोटाला ती जबाबदार असल्याचं म्हटलं गेलं होतं.

Aamir Khan : 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत काम करणार आमिर खान; अफेअरपासून लग्नाच्याही होत्या चर्चा
Aamir KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 7:20 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : गेल्या वर्षी ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता आमिर खानने चित्रपटातून ब्रेक घेतला. आता जानेवारी 2024 पासून तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करण्यास सुरुवात करणार आहे. ‘सितारे जमीन पर’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून याची निर्मिती स्वत: आमिरच करणार आहे. याशिवाय त्याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत आणखी सहा चित्रपटांची निर्मिती होणार आहे. त्यापैकी एका चित्रपटात आमिर अशा अभिनेत्रीसोबत काम करणार आहे, जिच्यासोबत त्याच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा होत्या. ही अभिनेत्री त्याच्यापेक्षा वयाने 27 वर्षांनी लहान आहे.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख आहे. याआधी आमिरने तिला एका मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकची ऑफर दिली होती. मात्र काही कारणास्तव हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नाही. आता आमिरने फातिमाला दुसऱ्या चित्रपटाची ऑफर दिली असून हा कॉमेडी ड्रामा असल्याचं कळतंय. यामध्ये फातिमाची मुख्य भूमिका असेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहे. अद्वैतने याआधी आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर शिक्कामोर्तब केलं जात आहे. 2024 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत याचं शूटिंग सुरू होईल.

हे सुद्धा वाचा

2021 मध्ये जेव्हा आमिर खान आणि किरण रावने त्यांचा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा फातिमाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. फातिमामुळेच या दोघांचं नातं तुटलं, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. 15 वर्षांच्या संसारानंतर आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला होता. 2005 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. फातिमाने कमल हासन यांच्या ‘चाची 420’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. आमिर खानच्या ‘दंगल’मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘थार’, ‘ल्युडो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

आमिर आणि किरण यांनी ज्यावेळी घटस्फोट जाहीर केला, त्यावेळी ट्विटरवर अचानक फातिमाचं नाव ट्रेंड होऊ लागलं होतं. ‘दंगल’ आणि ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांनंतर आमिर आणि फातिमा यांच्यात काहीतरी शिजत असल्याची जोरजार चर्चा होती. मात्र फातिमाने वेळोवेळो या चर्चांना अफवा असल्याचं म्हणत नाकारलं होतं.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.