आयरा खानच्या पार्टीत सावत्र आई किरण रावने गायलं गाणं; जावयासोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स

3 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे उदयपूरमध्ये विधीवत लग्न करणार आहेत. या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वी आयोजित केलेल्या पार्टीत आयराची सावत्र आई किरण रावने खास गाणं गायलं आहे.

आयरा खानच्या पार्टीत सावत्र आई किरण रावने गायलं गाणं; जावयासोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स
सावत्र लेकीच्या लग्नात किरण रावने गायलं गाणंImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 8:17 AM

उदयपूर : 9 जानेवारी 2024 | अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने 3 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आता उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूर विधीवत लग्न करणार आहेत. 3 जानेवारी रोजी मुंबईत लग्नानंतर सर्व कुटुंबीय उदयपूरला रवाना झाले. तिथे लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. आयराच्या हातावर नुपूरच्या नावाची मेहंदी लागली आहे. कुटुंबीयांसह सर्व मित्रपरिवारसुद्धा उदयपूरमध्ये पोहोचला आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे आणि तयारीचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओमध्ये आयराची सावत्र आई आणि आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव गाणं गाताना दिसतेय. तिच्या गाण्यावर आयरा आणि नुपूर रोमँटिक डान्स करत आहेत.

या व्हिडीओमध्ये किरण राव इंग्रजी गाणं गाताना दिसतेय. त्याच गाण्याच्या तालावर नुपूर आणि आयरा रोमँटिक डान्स करत आहेत. तर तिथे उपस्थित असलेले इतर पाहुणे किरणच्या गायकीचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ आयरा आणि नुपूरच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या एका पाहुण्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. लग्नापूर्वी आयोजित केलेल्या पार्टीतील हा व्हिडीओ असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सर्वांनी पाश्चिमात्य कपडे परिधान केले आहेत. आयराने काळ्या रंगाचा शॉर्ट जंपसूट तर नुपूरने पँट-शर्ट घातला आहे. या पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी आयराची मेहंदी पार पडली. तिच्या मेहंदीचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. उदयपूरमध्ये पोहोचल्यानंतर वर आणि वधू कुटुंबीयांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथल्या स्थानिक लोकांसोबत आमिर खान आणि किरण रावने ठेका धरला होता. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. आयराच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात किरणने आवर्जून उपस्थिती लावली आहे.

आमिर खानचा जावई नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस कोच आणि कन्सल्टंट आहे. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी नुपूरचे क्लाएंट आहेत. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान आयरा तिच्या वडिलांसोबत राहत होती. त्यावेळी तिची पहिल्यांदा ओळख नुपूरशी झाली. सुरुवातीला ही ओळख आयराच्या फिटनेससाठीच झाली होती. हळहळू या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.