‘बाबुल की दुआएं’, आयरा खानच्या लग्नातील Unseen व्हिडीओ समोर, आमिर खानला पाहून म्हणाल…

Ira Khan - Aamir Khan : लेकाच्या लग्नात आमिर खान याच्या डोळ्यात होतं सतत पाणी... आयरा खानच्या लग्नातील Unseen व्हिडीओ व्हायरल, आमिर म्हणतोय, 'बाबुल की दुआएं...', सोशल मीडियावर सध्या आयरा आणि आमिर खान यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल...

'बाबुल की दुआएं', आयरा खानच्या लग्नातील Unseen व्हिडीओ समोर, आमिर खानला पाहून म्हणाल...
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 12:23 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान अभिनेत्री नसली तरी चर्चेत असते. आयरा खान तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. 2024 मध्ये वर्षाच्या सुरुवातील आयरा हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं. आयरा आणि नुपूर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. आता देखील आयरा हिच्या लग्नाचा एक अनसीन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ खुद्द आयरा हिने पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये आमिर खान प्रत्येक क्षणी भावूक झालेला दिसत आहे.

आयरा खान हिने इन्स्टाग्रामवर लग्नाचा चार मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये खान कुटुंब आनंदात दिसत आहे. व्हिडीओमध्ये लेकीच्या संगीत कार्यक्रमात आमिर पाहुण्यांचं स्वागत करताना दिसत आहे. तर दुसरी पत्ना किरण राव अभिनेत्याची शॉल व्यवस्थित करताना दिसत आहे. एवढंच नाही तर, लेकीच्या लग्नात आमिर खान याने भन्नाट डान्स देखील केला. शिवाय किरण , आमिर यांनी मुलासोबत ‘फूलों का तारों का’ गाणं देखील गायलं.

हे सुद्धा वाचा

सावत्र आई, भाऊ आणि वडील गाणं म्हणत असताना आयरा देखील भावूक झाली. त्यानंतर आमिर याने लेकीसाठी ‘बाबुल की दुआएं…’ हे गाणं गायलं… गाणं गाताना अभिनेता भावूक झाला. शिवाय अभिनेत्याने लेकीचं कौतुक देखील केलं. ‘आयरा खूप लवकर मोठी झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः गेल्या तीन वर्षांमध्ये मी आरया हिच्याकडून फार काही शिकलो आहे…’ असं देखील व्हिडीओमध्ये अभिनेता बोलताना दिसत आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांना जानेवारी 2024 मध्ये लग्न केलं. लग्नाआधी आयरा आणि नुपूर यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं. नुपूर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूर कायम सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

आमिर खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘सितारे जमीन पर’ सिनेमात अभिनेता दिसणार आहे. याआधी अभिनेत्याने दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत ‘लापता लेडिज’ सिनेमात एकत्र काय केलं होतं. सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी आमिर खान याच्यावर होती. ‘लापता लेडिज’ सिनेमा चाहते आणि सेलिब्रिटींना देखील प्रचंड आवडला.

आता अभिनेता ‘सितारे जमीन पर’ सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. सिनेमात अभिनेत्री जिनिलिया देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा ख्रिसमसच्या अखेरीस मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.