आमिर खान याने केली अमिताभ बच्चन यांच्याकडे अत्यंत मोठी तक्रार, म्हणाला, तुम्ही…
बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन हे कायमच दिसतात.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबर 2024 रोजी वाढदिवस असतो. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या गेल्या. हेच नाही तर जलसा बंगल्याबाहेर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे देखील बघायला मिळाले. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात अभिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. जलसा बंगल्याबाहेर येत आपल्या चाहत्यांना अमिताभ बच्चन भेटले. याचेच अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा कडोपतीला होस्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या सीजनमध्ये आपल्या खासगी आयुष्याबद्दलही मोठे खुलासे करताना अमिताभ बच्चन हे दिसतात. आता अमिताभ बच्चन यांचा काैन बनेंगा करोडपतीच्या मंचावर साजरा करण्यात आला. यावेळी मोठे सरप्राईज अमिताभ बच्चन यांना देण्यात आले.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सरप्राईज देण्यासाठी आमिर खान आणि त्याचा लेक पोहोचले होते. विशेष म्हणजे आमिर खान याला पाहून अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आणि मोठा आनंद देखील बघायला मिळाला. आता त्याचेच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
आमिर खान यावेळी अमिताभ बच्चन यांच्यावर मोठी तक्रार करताना देखील दिसला. आमिर खान बिग बी यांना म्हणाला की, सर माझी तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. तुम्ही म्हणतात की, मी, शाहरूख आणि सलमान खान मोठे स्टार आहोत. आम्ही येतो तेंव्हा लोक उभे राहतात. पण तुम्हाला पाहून सलमान, शाहरूख आणि आणि मी एक्सायटेड होतो.
आमिर खान हा पुढे म्हणाला की, तुम्ही प्रत्येक हिंदूस्तानी व्यक्तीच्या मनात आहात. तुमचा वाढदिवस सर्व देशात साजरा केला जातो. यावेळी आमिर खान हा अमिताभ बच्चन यांना देशातील लोकांचे व्हिडीओ मेसेज दाखवताना देखील दिसतोय. लोकांचे प्रेम पाहून अमिताभ बच्चन यांचा आनंद गगणात मावता नव्हता. यावेळी भावूक होतानाही अमिताभ बच्चन दिसले.