जसप्रीत बुमराहने उडवली आमिर खानची खिल्ली; ‘लाल सिंग चड्ढा’च्या कमाईवरून जखमेवर चोळलं मीठ

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता. जवळपास 180 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमी कमाई केली होती.

जसप्रीत बुमराहने उडवली आमिर खानची खिल्ली; 'लाल सिंग चड्ढा'च्या कमाईवरून जखमेवर चोळलं मीठ
जसप्रीत बुमराहने उडवली आमिर खानची खिल्लीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 8:26 AM

मुंबई : अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. या चित्रपटानंतर आमिरने अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेतला. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर सध्या कोणत्याच चित्रपटासाठी काम करत नसला तरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा क्रिकेटर जसप्रीत बुमराहने आमिरची खिल्ली उडवली आहे. इतकंच नव्हे तर आमिरसुद्धा मस्करी करताना दिसत आहे.

आमिर आणि जसप्रीत हे फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम्स 11 वरील एका जाहिरातीत एकत्र झळकले आहेत. 15 सेकंदांच्या या जाहिरातीत आमिर खान जसप्रीतला म्हणतो, “बूम बूम, बॉल ध्यान से डालियो. बडे – बडे हिट मारता हूँ.” त्यावर बुमराह आमिरची खिल्ली उडवत त्याला उत्तर देतो, “इतने हिट्स मारते हो सर, तो लाल सिंग का क्या हुआ?”

अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता. जवळपास 180 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमी कमाई केली होती. या चित्रपटातील आमिरच्या अभिनयाचं कौतुक झालं, मात्र त्याचसोबत त्याच्या पंजाबी बोलण्याची खिल्लीही उडवली गेली. यामध्ये आमिरसोबत करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

याआधीही अशाच एका जाहिरातीतून रोहित शर्माने आमिर खानची खिल्ली उडवली होती. आमिर म्हणतो, “आम्ही विचार केला की हे लोक अभिनयात व्यस्त आहेत तर आम्हीच क्रिकेट खेळतो.” आमिरच्या क्रिकेट खेळण्याच्या वक्तव्यावर रोहित शर्मा म्हणतो, “लगान चित्रपटात क्रिकेट खेळून कोणी क्रिकेटर बनत नाही.” त्यावर माधवन आमिरला पाठिंबा देत म्हणतो, “आमिरने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.” माधवनच्या या वक्तव्यावर रोहित आमिरची खिल्ली उडवत पुढे म्हणतो, “दोन वर्षांत एक हिट देऊन कोणी हिटमॅन बनत नाही.”

हा व्हिडीओ एका ॲपच्या प्रमोशनचा असला तरी क्रिकेटर्स आणि अभिनेते यांच्यातील ही जुगलबंदी चाहत्यांना खूप आवडली. त्याचसोबत हे कलाकार खरंच क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.