आमिर खानचे 7 अफेअर्स; 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबतही जोडलं गेलं नाव
अभिनेता आमिर खानने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल वाढदिवशी मोठा खुलासा केला आहे. गेल्या दीड वर्षापासून एका व्यक्तीला डेट करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. गौरी असं तिचं नाव असून आमिर तिला गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. आपल्या 60 व्या वाढदिवशी आमिरने त्याच्या नव्या रिलेशनशिपची माहिती सर्वांना दिली आहे. 25 वर्षांपासूनची मैत्रीण गौरीसोबत नात्यात असल्याचं त्याने पापाराझींसमोर जाहीर केलं. “मी आणि गौरी गेल्या 25 वर्षांपासून चांगले मित्र आहोत. आता आम्ही एकमेकांसोबत आहोत. आम्ही एकमेकांबद्दल सीरिअस आणि कमिटेड आहोत. गेल्या दीड वर्षापासून आम्ही सोबत आहोत”, असं तो म्हणाला. यावेळी आमिरला त्याच्या तिसऱ्या लग्नाविषयीही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो हसत म्हणाला, “वयाच्या 60 व्या वर्षी हे शोभेल की नाही माहीत नाही.”
आमिर खानने याआधी दोन वेळा लग्न केलंय. त्याने पहिलं लग्न रीना दत्ताशी केलं होतं. या दोघांना आयरा आणि जुनैद ही मुलं आहेत. लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण रावसोबतही आमिरचा संसार 15 वर्षे टिकला. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. याशिवाय आमिरची नावं इतरही काही अभिनेत्रींसोबत जोडली गेली होती.




View this post on Instagram
अभिनेत्री ममता कुलकर्णीसोबत आमिरच्या अफेअरच्या चर्चा होत्या. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये अफेअर सुरू झाल्याचं म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही, कारण त्यावेळी आमिर विवाहित होता. ममतानंतर आमिर आणि पूजा भट्ट यांच्याही नात्याच्या जोरदार चर्चा होत्या. त्यावेळीही आमिर विवाहित होता. आमिरचं नाव ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्सशीही जोडलं गेलं होतं. जेसिकासोबतच्या अफेअरमुळे आमिर खान वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कारण त्यावेळी ब्रिटिश पत्रकार जेसिकाने दावा केला होता की आमिर खान तिच्या मुलाचा पिता आहे.
आमिर खानचं नाव रेचेल शैलीसोबतही जोडलं गेलं होतं. या दोघांनी ‘लगान’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आमिर आणि ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. किंबहुना फातिमामुळेच आमिरने किरणला घटस्फोट दिल्याचं म्ह्टलं गेलं होतं. फातिमा ही आमिरपेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान आहे. ‘दंगल’मध्ये फातिमाने आमिरच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती.