मुंबई | 14 जानेवारी 2024 : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान हिने जीम ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतं आहे. उदयपूर याठिकाणी मोठ्या थाटात लग्न झाल्यानंतर 13 जानेवारी रोजी मुंबई याठिकाणी आयरा – नुपूर यांच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फक्त सेलिब्रिटी नाही तर, राजकीय मंडळी देखील आयरा – नुपूर यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थित होते.
आयरा – नुपूर यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी अनेक जण एकत्र आले होते. पण आयरा खान हिची सावत्र आई आणि आमिर खान याची दुसरी पत्नी रिसेप्शन पार्टीतून गायब होती. किरण राव रिसेप्शन पार्टीत उपस्थित नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पण खुद्द आमिर खान याने किरण रिसेप्शन पार्टीत का नाही आली याचं कारण सांगितलं आहे.
आमिर खान म्हणाला, ‘किरणची प्रकृती ठिक नाहीये. ही तिच्या आगामी सिनेमाची टीम आहे. यांच्यासोबत मी तुमची ओळख करुन देतो… ‘लापता लेडीज’ किरणचा सिनेमातील हे कलाकार आहेत…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किरण आणि आयरा – नुपूर यांच्या रिसेप्शन पार्टीची चर्चा रंगली आहे.
आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये आयोजित करण्यात आली होती. या रिसेप्शन पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, यांनी हजेरी लावली होती.
बॉलिवूडमधून देखील अनेक जण आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थित होते. अभिनेता सलमान खान, अभिनेता शाहरुख खान – गौरी खान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, श्वेता तिवारी, पलक तिवारी… यांसारखे अनेक सेलिब्रिटी आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थित होते. सध्या त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.