श्रीदेवी यांच्या मुलीसोबत रोमान्स करणार आमिर खानचा मुलगा; जोडीविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

"जर मी माझ्या आयुष्यात कोणाला सर्वांत जास्त घाबरत असेन, तर तो जुनैदच आहे. तो खूप शिस्तप्रिय आहे. त्याच्या मिटींगला जर मी उशिरा गेलो, तर मला ओरडा बसतो. त्यामुळे त्याच्या मिटींग्सला मी कधीच उशिरा जात नाही," असं आमिरने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

श्रीदेवी यांच्या मुलीसोबत रोमान्स करणार आमिर खानचा मुलगा; जोडीविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
Junaid Khan and Khushi KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 4:09 PM

बऱ्याच महिन्यांच्या चर्चेनंतर अखेर बॉलिवूडमधल्या एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा झाली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. जुनैद आणि खुशी पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करणार असून हा एक रोमँटिक चित्रपट असेल. चित्रपटाच्या टीमकडून नुकतीच याबद्दलची घोषणा झाली आहे. मंगळवारी निर्मात्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केली. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अद्वैतने याआधी आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या पोस्टरमध्ये एक मुलगा आणि मुलगी सेल्फी घेताना दिसत आहेत. ‘प्रेम, आवड आणि त्यादरम्यानच्या सर्व गोष्टींबद्दलचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलंय. जुनैद आणि खुशीच्या या पेंटिंगने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. या चित्रपटाचं नाव काय असेल, ट्रेलर कधी लाँच करणार आणि त्यात इतर कोणाच्या भूमिका असतील, याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Srishti (@srishtibehlarya)

हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘लव्ह टुडे’ या हिट तमिळ चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. मात्र याविषयी अद्याप निर्मात्यांनी माहिती दिली नाही. खुशी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची छोटी मुलगी आहे. तिने झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलंय. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये खुशीसोबतच सुहाना खान, अगस्त्य नंदा, मिहिर अहुजा, वेदांग रैना यांच्याही भूमिका होत्या.

आमिर खानचा मुलगा जुनैद यानेसुद्धा ओटीटीच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. त्याने नेटफ्लिक्सवरील ‘महाराज’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलंय. या चित्रपटात जुनैदसोबतच शर्वरी वाघ, शालिनी पांडे, जयदीप अहलावत यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील जुनैदच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांचा मुलगा आहे. मात्र लहानपणापासूनच तो मितभाषी आणि एकट्यात राहणं पसंत करणारा असल्याने त्याच्या भविष्याविषयी फार चिंता होती, असं आमिर एका मुलाखतीत म्हणाला होता. इतकंच नव्हे तर जुनैद हा इंडस्ट्रीतल्या सर्व स्टारकिड्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याला स्वबळावर सर्वकाही मिळवायचं असून अजूनही तो कारपेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, असंही आमिरने सांगितलं होतं.

जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.