चेन्नईच्या पुरात अडकला आमीर खान, अभिनेत्याला असे केले रेस्क्यू

Cyclone Michaung : चक्रीवादळामुळे चेन्नईला मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात आमिर खान अडकला होता. विष्णू विशालने राज्याच्या अग्निशमन आणि बचाव विभागाने वाचवल्यानंतरची फोटो शेअर केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.

चेन्नईच्या पुरात अडकला आमीर खान, अभिनेत्याला असे केले रेस्क्यू
aamir khan
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 8:12 PM

Aamir Khan Stuck In Chennai Flood : मिचॉन्ग  चक्रीवादामुळे चेन्नईचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक लोकं अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सुरु आहे. त्यातच बॉलीवूड अभिनेता आमिर खान देखील पूराच्या पाण्यात अडकला होता. आमीर खानला जवानांनी सुरक्षित स्थळी हलवले. सध्या सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेता आमिर खान याला पाण्यातून बोटीच्या मदतीने पाण्यातून सुरक्षित स्थळी नेतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले गेले आहेत. गेल्या २४ तासांपासून अभिनेता आमिर खान पाण्यात अडकला होता. अभिनेता विष्णू विशालही त्याच्यासोबत असल्याचे वृत्त आहे. या वादळातून दोघांचीही सुटका करण्यात आली आहे.

विष्णू विशालने स्वतः आपल्या X अकाउंटवर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. फोटोंमध्ये विष्णू विशाल, आमिर खान आणि बचाव विभागाचे जवान एकत्र दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना विशालने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमच्यासारख्या अडकलेल्या लोकांना मदत केल्याबद्दल अग्निशमन आणि बचाव विभागाचे आभार… आणि सर्व प्रशासकीय लोकांचेही आभार जे सतत काम करत आहेत.

आमिर खान शेवटचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर दिसली होती.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच खराब कामगिरी केली, त्यानंतर अभिनेत्याने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.