Happy Birthday : आमिर खानचा वाढदिवस, जाणून घ्या काही खास गोष्टी

आमिर खान आज म्हणजेच 14 मार्च आपला वाढदिवस साजरा करत आहेत. (Aamir Khan's Birthday, know some interesting things)

Happy Birthday :  आमिर खानचा वाढदिवस, जाणून घ्या काही खास गोष्टी
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 11:53 AM

मुंबई : आमिर खान आज म्हणजेच 14 मार्च आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आमिर दरवर्षी आपला वाढदिवस माध्यमांसोबत साजरा करतो. या दरम्यान, आमिर मोकळेपणानं बोलतो, त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे आमिरनं त्याचा वाढदिवस माध्यमांसोबत साजरा केला नव्हता आणि रिपोर्ट्सनुसार या वर्षीही त्याचा वाढदिवस माध्यमांसोबत होणार नाहीये. मात्र अशीही बातमी आहे की, आमिर आपल्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहे.

वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा करणार

आमिर आपला वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा करू शकतो. साधारणत: त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतं. तो पत्नी किरण आणि तिन्ही मुलांसमवेत वेळ घालवतो.

आमिरचं हरफनमौला गाणं प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी एली अवरामसोबत आमिरचं हरफनमौला हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात आमिर खान आणि एली अवराम यांची सर्वोत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर आमिर खानच्या चाहत्यांना हे गाणं प्रचंड आवडलं आहे. या गाण्यात आमिर खानचा लूक पूर्णपणे वेगळा असून, यात तो खूपच तरुण आणि हॉट दिसतोय.

कुणाल कपूरच्या ‘कोई जाने ना’ चित्रपटातील हे गाणं

हे गाणं कुणाल कपूरच्या ‘कोई जाने ना’ या चित्रपटातील आहे. आमिरचा मित्र अमीन हाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खाननं स्वत: या गाण्यासाठी आपला लूक निवडला होता. आमिरला जेव्हा गाण्याचं कथानक आणि हेतू समजला, तेव्हा त्यानं स्वत:चं रुप बदललं. याबद्दल त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी चर्चा केली.

‘लालसिंग चड्ढा’ची प्रतीक्षा

आमिरचे चाहते त्याच्या आगामी लालसिंग चड्ढा या चित्रपटाची वाट पहात आहेत. या चित्रपटात करीना कपूर खान आमिरसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कोरोनाच्या अगोदर दोघांनीही चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं होतं, मात्र नंतर शूटिंग थांबवावं लागलं. तरीही कोरोनाची परिस्थिती जसजशी ठीक झाली तशीच आमिर आणि करीनानं पुन्हा चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं.

आमिर लास्ट थग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये झळकला होता. या चित्रपटात आमिरबरोबर अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत होते. एवढा उत्तम स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

संबंधित बातम्या 

Sussanne Khan | आधी हृतिकसोबत घटस्फोट, आता अली गोनीच्या भावाला डेट करतेय सुझान खान!

RRR | आलिया भट्टच्या वाट्यालाही ‘सीते’ची भूमिका, मार्चमध्ये चाहत्यांना मिळणार मोठे सरप्राईज!

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.