मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. यावेळी आमिर हा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर लेकीच्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. आमिर खान याची लेक इरा खान ही लवकराच लग्न बंधनात अडकणार आहे. इरा खान ही नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून इरा खान आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत. बऱ्याच वेळा हे एकमेकांसोबतचे खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आमिर खान याच्या घरी सध्या लेकीच्या लग्नाची गडबड सुरू असल्याचे देखील बघायला मिळतंय.
नुकताच सोशल मीडियावर आमिर खान याच्या लेकीच्या लग्नाची पत्रिका ही जोरदार व्हायरल होताना दिसतंय. मध्यंतरी चर्चा होती की, इरा खान आणि नुपूर यांचे लग्न 3 जानेवारी 2024 ला होणार आहे. आताच व्हायरल झालेल्या लग्नाच्या पत्रिकेवरून हे स्पष्ट झालंय की, लग्न हे 3 जानेवारी 2024 नव्हे तर 13 जानेवारी 2024 आहे.
आमिर खान याच्या लेकीच्या लग्नाची पत्रिका तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, हे लग्न नेमके कुठे पार पडणार हे अद्यापही कळू शकले नाहीये. काही दिवसांपूर्वीच आमिर खानच्या लेकीचा साखरपुडा हा मुंबईमध्ये पार पडला. यावेळी अत्यंत जवळचे व्यक्ती या साखरपुड्यासाठी उपस्थित होते.
या व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये दिसत आहे की, पाहुण्यांना गिफ्ट न आणण्यास सांगण्यात आले आहे. इरा खान ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये इरा खान हिने स्पष्ट केले की, तिचा कोणत्याच विचार सध्या नाहीये की, तिने बाॅलिवूडमध्ये काम करावे.
काही दिवसांपूर्वीच इरा खान ही नुपूर शिखरे याच्यासोबत राजस्थान येथे मस्ती करताना दिसली. इरा खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना इरा खान ही दिसते. इरा खान हिच्या लग्नाची चाहते वाट पाहताना दिसत आहेत.