आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

आमिर खानच्या आईवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
आमिर खान, झीनत खानImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 7:36 PM

मुंबई- आमिर खानची आई झीनत यांना हृदयविकाराचा झटका आला. दिवाळी साजरी करण्यासाठी आमिर आणि त्याचे कुटुंबीय पंचगणी इथल्या घरी गेले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. घटनेप्रसंगी आमिरसुद्धा त्यांच्यासोबतच होता. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, झीनत यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचाराला प्रतिसाद देत आहेत.

ताज्या माहितीनुसार, आमिरच्या आईची तब्येत आता पहिल्यापेक्षा ठीक आहे. उपचारांना त्या चांगला प्रतिसाद देत आहेत. आईला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती बाहेर पडू नये याची आमिर आणि त्याच्या कुटुंबीयांनी काळजी घेतली होती. आईच्या प्रकृतीविषयी कोणतीची अफवा सोशल मीडियावर पसरू नये, यासाठी त्यांनी ही काळजी घेतल्याचं म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी आमिरने जेव्हा ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये हजेरी लावली, तेव्हा कुटुंबाविषयी असलेली खंत बोलून दाखवली होती. कुटुंबीयांसोबत, मुलांसोबत अधिक वेळ घालवता आला नाही, याचा पश्चात्ताप होत असल्याचं त्याने म्हटलं. आई आणि मुलांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आता पहिल्यापेक्षा जास्त प्रयत्न करत असल्याचंही त्याने कबूल केलं.

हे सुद्धा वाचा

“मी माझा पूर्ण वेळ कामासाठी दिला आणि कामासोबतचं नातं घट्ट केलं. माझं कुटुंब माझ्यासोबत नेहमीच राहील असं मी गृहीत धरलं. त्यावेळी मला प्रेक्षकांची मनं जिंकायची होती. त्या वाटेत मी इतका हरवून गेलो मी माझं कुटुंब माझी वाट पाहतंय हे विसरूनच गेलो होतो”, अशी खंत आमिरने व्यक्त केली होती

'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली.
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला.
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर.
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला.
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज.
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'.
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत.
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?.