Parineeti – Raghav यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर; खासदार म्हणाले, ‘आनंद साजरा करण्यासाठी…’

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर, अखेर खासदार चड्ढा यांनी सोडलं मौन; लवकरच होणार लग्न? सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा

Parineeti - Raghav यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर; खासदार म्हणाले, 'आनंद साजरा करण्यासाठी...'
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 3:10 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याच्या चर्चांनी सध्या तुफान जोर धरला आहे. हॉटेलबाहेर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर परिणीती – राघव चड्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगली. एवढंच नाही तर, दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चांनी देखील सर्वत्र जोर धरला आहे. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल काही महत्त्वाची माहिती दिली नसली तरी, दोघांच्या नात्यावर अनेक गोष्टी समोर येत आहे. शिवाया लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर दोघे कामय लाजताना आणि हसताना दिसतात. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत आहेत.

आता देखील खासदार राघव चड्ढा यांना परिणीती चोप्रा हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. पण राघव चड्ढा यांनी स्पष्ट होकार दिला नसला तरी, चाहत्यांना हिंट दिली आहे. परिणीती हिच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर राघव चड्ढा म्हणाले, ‘तुम्हाला आनंद साजरा करण्यासाठी संधी मिळेल….’ राघव चड्ढा यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

यापूर्वी देखील परिणीतीसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर जेव्हा राघव यांना विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही मला राजनितीबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल नाही.” लग्नाबद्दल विचारलं तेव्हा “जेव्हा लग्न करेन तेव्हा तुम्हाला सांगेन” असं उत्तर दिलं.

हे सुद्धा वाचा

खासदार संजीव अरोरा यांनी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केलीये. संजीव अरोरा याने पोस्टमध्ये म्हटले की, मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मनापासून अभिनंदन करतो…खूप प्रेम आणि आशीर्वाद… माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा… या पोस्टमुळे देखील दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांची ओळख महाविद्यालयापासून आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगत आहे.

परिणीती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिवाय परिणीती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची बहीण देखील आहे. परिणीताने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. सध्या परिणीती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

परिणीता हिने अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात घर केलं. परिणीताने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज vs रिक्की’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते कायम परिणीताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.