ऐश्वर्याच्या वाढदिवशी आराध्याचं पहिलं पब्लिक स्पीच; नेटकरी म्हणाले “ही तर जया बच्चन..”

आराध्या बच्चनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून यामध्ये ती सर्वांसमोर माईकवर बोलताना दिसतेय. आराध्या तिच्या आईबद्दल खास दोन शब्द बोलते आणि ते ऐकून ऐश्वर्यालाही तिच्यावर अभिमान वाटतो.

ऐश्वर्याच्या वाढदिवशी आराध्याचं पहिलं पब्लिक स्पीच; नेटकरी म्हणाले ही तर जया बच्चन..
Aishwarya and AaradhyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 5:08 PM

मुंबई : 2 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच चाहते आणि पापाराझींच्या नजरेत असते. आराध्याच्या शाळेतल्या कार्यक्रमातील व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये आराध्या पहिल्यांदा पब्लिक स्पीच देताना म्हणजेच लोकांसमोर बोलताना दिसत आहे. आई ऐश्वर्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आराध्याने खास भाषण दिलं. हे भाषण तिने तिच्या आईसाठी दिलं आहे. ऐश्वर्याने कॅन्सरग्रस्तांसोबत तिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय यांच्यासोबत पोहोचली होती. आईचं कौतुक करताना आराध्या म्हणते, “माझी प्रेमळ आई.. तू माझं आयुष्य आहेस. माझ्या मते तू जे करतेय ते खूप महत्त्वाचं आणि अविश्वसनीय आहे.” मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकताना ऐश्वर्याही भावूक होते. आराध्या पुढे म्हणते, “आपण एका उद्देशाने हा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या आजूबाजूला असलेल्यांची मदत करणं, जगाची मदत करणं.. मी फक्त इतकंच म्हणू इच्छिते की तू जे काही करतेस, ते खूप चांगलं आहे आणि कौतुकास्पद आहे.” आराध्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘आराध्याचा आवाज खूप सुंदर आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘इतक्या लोकांसमोर माईकवर बोलणं सोपं नाही. आराध्याचा आत्मविश्वास खूप चांगला आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘आराध्या किती लवकर मोठी झाली’, असंही काहींनी म्हटलंय. ऐश्वर्याने तिच्या वाढदिवशी आराध्याच्या हस्ते एक कोटी रुपये कॅन्सर पीडितांसाठी दान केले आहेत.

पहा व्हिडीओ

याच कार्यक्रमात ऐश्वर्याने तिच्या आईच्या आजारपणाविषयी खुलासा केला. आईला कॅन्सर झाला होता असं ऐश्वर्याने सांगितलं. या वर्षाच्या सुरुवातीला वृंदा यांना कॅन्सरचं निदान झालं होतं आणि आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचं ऐश्वर्याने स्पष्ट केलं. याविषयी बोलताना ऐश्वर्याला अश्रू अनावर झाले. “ओके, मला हे बोलायला पाहिजे की नाही माहीत नाही, पण कॅन्सर या आजाराने आमच्या आयुष्यालाही स्पर्श केला आहे. आधी माझ्या बाबांना आणि त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला माझी आई कॅन्सरग्रस्त झाली होती. पण आता ती त्यातून बाहेर पडली आहे. अनेकांकडून मिळालेल्या प्रेम, आशीर्वादामुळे आणि खूप साऱ्या प्रतिभावान डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ती आता ठीक आहे”, अशा शब्दांत ऐश्वर्या व्यक्त झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.