ऐश्वर्या राय नव्हे तर थेट रंगली आराध्या बच्चन हिच्या लूकची चर्चा, ‘ते’ फोटो व्हायरल, अभिनेत्री…
ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ऐश्वर्या दिसते. ऐश्वर्या ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यांच्या घटस्फोटाचे कारण असूनही कळू शकले नाही. मध्यंतरी सांगण्यात आले की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे. हेच नाही तर सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय ही अनेकदा विदेशात जाताना दिसली. मात्र, कधीच तिच्यासोबत अभिषेक बच्चन हा दिसला नाही. अनंत अंबानी याच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत स्पॉट झाली.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना मुलगी आराध्या हिच्यासोबत जलसा बंगल्यावर ऐश्वर्या राय ही पोहोचली. मात्र, यावेळी ऐश्वर्या राय हिच्या लूकपेक्षाही अधिक चर्चा ही आराध्या बच्चन हिच्या लूकची रंगताना दिसली. लोकांना आराध्या बच्चन हिचा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.
ऐश्वर्या राय हिच्यासोबत जलसा बंगल्यावर शाळेतील ड्रेसवर आराध्या बच्चन ही पोहोचली. जबरदस्त लूकमध्ये आराध्या दिसली. काही दिवसांपूर्वी चाहते हे ऐश्वर्या राय हिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसले. आराध्या बच्चन हिच्या एकाच हेअरस्टाईलमुळे लोक ऐश्वर्याला बोलताना दिसले. अनंत अंबानी याच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये वेगळ्या आणि सुंदर लूकमध्ये आराध्या ही दिसली.
अनंत अंबानीच्या प्री वेडिंग लूकमधील आराध्याचा लूक सर्वांनाच आवडला. ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा असताना यावर भाष्य करणे बच्चन कुटुंबाकडून टाळण्यात आले. मात्र, काही वर्षांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी मोठे भाष्य केले होते. त्यांनी अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या यांचे नाते कसे आहे हे सांगितले.
जया बच्चन यांनी थेट म्हटले होते की, अमिताभ बच्चन यांनी कधीच ऐश्वर्या राय हिला सून मानले नाही. अमिताभ बच्चन यांनी कायमच ऐश्वर्याला मुलगी मानले आहे. ज्यावेळी ऐश्वर्या ही घरात असते, त्यावेळी आमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. ऐश्वर्याने श्वेता बच्चन हिची कमी आमच्या आयुष्यातील कमी केली आहे.