ऐश्वर्या लाय… बोबड्या भाषेत चिमुकल्याच्या तोंडून नाव ऐकल्यानंतर आराध्याने दिली अशी प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ

अभिनेत्री ऐश्वर्या रायची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते आतूर असतात. अशातच एका चिमुकल्या मुलाने तिला तिच्या नावाने हाक मारली आणि ते ऐकताच ऐश्वर्या त्याच्याकडे वळून पाहते. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्यावर आराध्याची प्रतिक्रियाही चर्चेत आहे.

ऐश्वर्या लाय... बोबड्या भाषेत चिमुकल्याच्या तोंडून नाव ऐकल्यानंतर आराध्याने दिली अशी प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ
Aaradhya Bachchan and Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 2:46 PM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा केवळ देशभरातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. ऐश्वर्या तिच्या सौंदर्यासोबतच दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ऐश्वर्यासोबतच तिची मुलगी आराध्या बच्चन सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. आराध्याचे फोटो किंवा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. नुकतीच ही मायलेकीची जोडी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र त्यापैकी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ऐश्वर्याच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला चाहता ऐश्वर्याला तिच्या नावाने हाक मारतो आणि ती मागे वळून त्याच्याकडे पाहून हसते.

लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी ऐश्वर्या आणि आराध्या पारंपरिक वेशभूषेत पोहोचले होते. ऐश्वर्याने यावेळी पांढरा पंजाबी सूट तर आराध्याने भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हे दोघं गर्दीतून पुढे जात असताना एक लहान मुलगा ऐश्वर्याला तिच्या नावाने हाक मारतो. मात्र ऐश्वर्याचं आडनाव तो बोबड्या भाषेत ‘राय’ ऐवजी ‘लाय’ असं म्हणतो. चिमुकल्याच्या तोंडून ‘ऐश्वर्या लाय’ असा आवाज ऐकल्यानंतर अभिनेत्री मागे वळून पाहते आणि हसते. यावेळी आराध्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. लहान मुलाच्या तोंडून आपल्या आईचं नाव ऐकल्यानंतर आराध्यासुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

‘आराध्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती’, असं एकाने लिहिलं. तर ‘तो चिमुकला खूपच नशिबवान आहे, कारण ऐश्वर्याने त्याच्याकडे मागे वळून पाहिलं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘सर्वांत क्यूट ऑडिओ आणि व्हिडीओ’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘आराध्या तिच्या मनात म्हणत असेल, तुझी हिंमत कशी झाली’, अशीही गमतीशीर कमेंट युजर्सनी केली.

ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. तर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या दोन्ही चित्रपटांमध्ये नुकतीच झळकली होती. यामधील तिच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक झालं.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.