तनुश्री दत्ता हिच्याकडून 18 वर्षांनंतर मोठा खुलासा, इमरान हाश्मी आणि किसिंग सीनबद्दल म्हणाली…

Aashiq Banaya Aapne : 'आश‍िक बनाया आपने' सिनेमातील इमरान हाश्मी - तनुश्री दत्ता यांची केमिस्ट्री आणि किसिंग सीन... 18 वर्षांनंतर अभिनेत्री म्हणाली...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तनुश्री दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा...

तनुश्री दत्ता हिच्याकडून 18 वर्षांनंतर मोठा खुलासा, इमरान हाश्मी आणि किसिंग सीनबद्दल म्हणाली...
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 11:06 AM

मुंबई | 10 जानेवारी 2024 : अभिनेत्री तनुश्री दत्ता आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री तिच्या पूर्वीच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. आता देखील तनुश्री हिने ऑनस्क्रिन दिलेल्या किसिंग सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्री तनुश्री हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ‘आश‍िक बनाया आपने’ सिनेमात तनुश्री हिने अभिनेता इमरान हाश्मी याच्यासोबत किसिंग सीन दिले होते. किसिंग सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘इमरान हाश्मी कम्फर्टेबल किसर नाही आणि मी देखील नाही…’ सांगायचं झालं तर, तनुश्री आणि इमरान यांनी तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. 18 वर्षांनंतर अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे..

‘आश‍िक बनाया आपने’ सिनेमात इमरान याच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनला तनुश्री ‘विचित्र’ म्हणाली. ‘मझ्यासाठी इमरान पहिल्या दिवसापासून फक्त एक अभिनेता होता. मी इमरान याच्यासोबत तीन सिनेमांमध्ये काम केलं आहे. आम्ही चॉकलेटमध्ये देखील एक किसिंग सीन शूट केला होता. पण तो सीन प्रदर्शित करण्यात नाही आला…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पहिल्यांदा इमरान याच्यासोबत किसिंग सीन देणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. दुसऱ्या वेळी मनावर असलेलं दडपण काही प्रमाणात कमी झालं होतं. कारण खासगी आयुष्यात आमच्या दोघांमध्ये काहीही ताळमेळ नाही. किसर-बॉय म्हणून आज इमरान याची ओळख आहे. पण इमरान कम्फर्टेबल किसर नाही आणि मी देखील किसर नाही..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तनुश्री हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

‘आश‍िक बनाया आपने’फेम अभिनेत्री तनुश्री दत्ता आता बॉलिवूड आणि अभिनय विश्वापासून दूर आहे. पण तनुश्री आजही तिचे सिनेमे आणि वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असते. तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे नाना पाटेकर यांच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली होती,

तनुश्री दत्ता हिने बॉलिवूडच्या दिग्गज व्यक्तींवर गंभीर आरोप केल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील महिलांना त्यांच्यावर झालेले अत्याचारांवर आवाज उठवला होता. ज्यामुळे अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या अडचणीत वाढ झाली होती. एवढंच नाही तर, अनेकांना पोलिसांच्या चौकशीला देखील सामोरं जावं लागलं होतं.

तनुश्री दत्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तनुश्री हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तनुश्री हिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.