वीस वर्षे जिच्यासोबत केला संसार; ती ठरली दुसऱ्याचीच पत्नी, ‘आशिक’ फेम अभिनेत्याची मोठी फसवणूक
दीपकने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2003 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. जवळपास 33 वर्षांनंतर दीपकने नादर यांच्यासोबत मिळवून ‘टिप्सी’ या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली होती.
मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये 70 ते 90 च्या दशकात असे बरेच कलाकार होते, ज्यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. तर काही कलाकार ठराविक भूमिका साकारल्यानंतर इंडस्ट्रीपासून दूर गेले. अशापैकीच एक अभिनेता म्हणजे ‘आशिकी’ या चित्रपटात भूमिका साकारलेला दीपक तिजोरी. हा अभिनेता सध्या 62 वर्षांचा आहे. दीपक तिजोरीने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘नशा’, ‘गुलाम’, ‘जो जिता वही सिकंदर’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. मात्र खासगी आयुष्यात त्याला बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागला.
दीपक तिजोरीने फॅशन डिझायनर शिवानी तोमरशी लग्न केलं होतं. या दोघांना समारा ही मुलगी आहे. मात्र पती-पत्नीचं नातं फारच वादग्रस्त राहिलं होतं. 2017 मध्ये दीपकला पत्नीवर संशय होता की तिचं योग प्रशिक्षकासोबत अफेअर आहे. पत्नीने त्यांना घराबाहेर काढलं होतं. त्याविरोधात त्याला कारवाईसुद्धा करायची होती. तो त्याच्या वकिलाकडे गेला आणि या केसदरम्यान त्याच्या पत्नीबद्दल धक्कादायक खुलासा झाला. पत्नीबद्दलचं सत्य समजल्यावर दीपकच्या पायाखालची जमीनच सरकली.
दीपक तिजोरी हा ज्या महिलेला त्यांची पत्नी मानत होता, ती त्याची पत्नीच नव्हती. तिचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीला घटस्फोट न देताच तिने दीपकसोबत लग्न केलं होतं. इतकंच नव्हे तर लग्नानंतर बरीच वर्षे दोघं सोबत होते. पत्नीविरोधातील खटल्यादरम्यान दीपक तिजोरीला कळून चुकलं होतं की शिवानी ही कायदेशीररित्या कधी त्यांची पत्नीच नव्हती.
दीपक तिजोरी सध्या इंडस्ट्रीत सक्रिय नाहीत. त्याने आपल्या करिअरमध्ये जवळपास 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. आमिर खानसोबत त्याची खास मैत्री होती. म्हणूनच त्याच्या गुलाम आणि जो जिता वही सिकंदरमध्ये दीपकने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. दीपकची मुलगी समारा ही वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत इंडस्ट्रीतच अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून काम करतेय.
दीपकने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2003 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. जवळपास 33 वर्षांनंतर दीपकने नादर यांच्यासोबत मिळवून ‘टिप्सी’ या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली होती. आशिकी, खिलाडी, जो जिता वही सिकंदर, कभी हा कभी ना, अंजाम, गुलाम, बादशाह यांसारख्या चित्रपटांमध्ये दीपकने सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. 1993 मध्ये ‘पहला नशा’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये पूजा भट्ट आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या.