हाडं तुटली, चेहरा बिघडला; ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीने सांगितल्या ‘त्या’ भयंकर अपघाताच्या आठवणी

अपघातानंतर अनु अग्रवालचं रातोरात बदललं आयुष्य; जगण्याचीही नव्हती आशा

हाडं तुटली, चेहरा बिघडला; 'आशिकी' फेम अभिनेत्रीने सांगितल्या 'त्या' भयंकर अपघाताच्या आठवणी
आशिकी फेम अनु अग्रवालImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 2:22 PM

मुंबई- सिनेप्रेमींना ‘आशिकी’ (Aashiqui) हा चित्रपट आणि त्यातील गाणी चांगलीच माहीत असतील. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) ही रातोरात स्टार बनली होती. बॉलिवूडमधील (Bollywood) हा तिचा पहिलाच चित्रपट होता. करिअरमधील पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने अनुला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. मात्र काही वर्षांनंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. चाहत्यांना तिच्या चित्रपटांची प्रतीक्षा होती. मात्र त्यावेळी अनुला भयंकर अपघाताचा सामना करावा लागला होता. या अपघाताने अनुचं संपूर्ण आयुष्यच बदललं होतं.

या अपघातात अनुच्या शरीराला बरीच दुखापत झाली होती. तिचा चेहरासुद्धा पूर्णपणे बिघडला होता. त्यातून सावरण्यास तिला बराच काळ लागला. आता बऱ्याच वर्षांनंतर अनु अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुला पुन्हा एकदा इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. मात्र तिच्यासाठी ते आता तितकं सोपं नाही.

हे सुद्धा वाचा

1990 मध्ये सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर 1999 मध्ये अनुचा अपघात झाला होता. अपघाताच्या भयानक आठवणी सांगताना अनु ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “तो काळ फक्त कठीण नव्हता. तर तो माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. मी कोमामध्ये होती. मी जगू शकेन की नाही, असा प्रश्न कुटुंबीयांना होता. जर वाचले तर मी पॅरालाइज्ड होईन की काय, अशीही भीती होती.”

पहा आताचे फोटो-

View this post on Instagram

A post shared by anu aggarwal (@anusualanu)

जवळपास 29 दिवसांनी अनु कोमातून बाहेर आली होती. मात्र त्यानंतर बराच काळ ती बेडवरून उठू शकत नव्हती. कारण तिचं अर्ध शरीर हे पॅरालाइज्ड होतं. त्या घटनेमुळे केवळ माझ्या शरीरावरच नाही तर माझ्या मानसिक स्वास्थ्यावरही खोलवर परिणाम झाला होता.

“मी माझ्या पायावर पुन्हा उभी राहू शकेन असं कोणालाच वाटलं नव्हतं. कारण शरीरात अनेक फ्रॅक्चर्स होते. पण मी पूर्णपणे बरी होईन, असा मला विश्वास होता. माझ्यासाठी तो पुनर्जन्मच होता”, असं तिने पुढे सांगितलं.

ग्लॅमरच्या विश्वात दिसण्याला सर्वाधिक महत्त्व असतं आणि या अपघातात अनुचा चेहराच खराब झाला होता. तिला कॉस्मेटिक सर्जरीचा सल्ला देण्यात आला होता. याविषयी बोलताना ती म्हणाली, “अनेकांनी मला प्लास्टिक सर्जरी करण्यास सांगितलं होतं. माझा आताचा चेहरा पाहून लोकांना खरंच वाटतं की मी सर्जरी केली. कारण माझा चेहरा खूप बदलला आहे.”

View this post on Instagram

A post shared by anu aggarwal (@anusualanu)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.