Salman Khan चा मेहुणा आयुष शर्मा वादाच्या भोवऱ्यात; ‘या’ कारणामुळे मिळाली कायदेशीर नोटीस

आयुषने २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'लव्हयात्री' सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पण आता एका कारणामुळे अभिनेत्याला कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली आहे.

Salman Khan चा मेहुणा आयुष शर्मा वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणामुळे मिळाली  कायदेशीर नोटीस
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 2:45 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे, तर दुसरीकडे भाईजानचा मेहुणा आणि अभिनेता आयुश शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आयुषने २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्हयात्री’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पण आता एका कारणामुळे अभिनेत्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. नुकताच या अभिनेत्याच्या आगामी ‘रुस्लान’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला, जो पाहिल्यानंतर चाहत्यांनी सिनेमा हिट होण्याची खात्री दिली आहे. मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर आयुष शर्मा स्टारर ‘रुस्लान’ सिनेमा कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

रिपोर्टनुसार, ‘रुस्लान’ सिनेमाचे निर्माते केके राधामोहन आणि अभिनेता आयुष शर्मा यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. सिनेमाच्या शीर्षकावरुन नोटीस पाठवण्यात आली आहे. वकील रुद्र विक्रम सिंग यांच्यामार्फत ‘रुस्लान’च्या निर्मात्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. विक्रम सिंग हे अभिनेता राजवीर शर्मा यांचे वकील आहेत. पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये सिनेमाचं नाव बदलण्यासाठी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

नोटीस पाठवणार्‍याच्या म्हणण्यानुसार; ‘रुस्लान’ नावाने सिनेमा 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात राजवीर सिंगसोबत ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीची मुलगी मेघा चॅटर्जी दिसली होती. अशा परिस्थितीत आयुष शर्माच्या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची चर्चा आहे. जर सिनेमात ‘रुस्लान’ या नावाचा उल्लेख झाला असेल तर, तो सिनेमाच्या डायलॉगमधून देखील काढून टाकला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

आयुष शर्मा स्टारर ‘रुस्लान’ सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक कात्यायन शिवपुरी यांनी केलं आहे. सिनेमात आयुष याच्यासोबत श्रेया मिश्रा, जगपति बाबू और विद्या मालवाडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण सिनेमाची चर्चा मात्र तुफान रंगत आहे. २१ एप्रिल रोजी ‘रुस्लान’चा टीझर प्रदर्शित झाला.

आयुष शर्मा सध्या बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. सोशल मी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.