महालापेक्षा कमी नाही Abdu Rozik चं दुबईतील घर; पाहा एक झलक
मुंबई : ‘बिग बॉस 16 ‘ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अब्दू रोझिक (Abdu Rozik) याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. एकेकाळी रस्त्यावर गाणं गाणारा अब्दू आज एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. ‘बिग बॉस 16 ‘ दरम्यान प्रेक्षकांनी देखील अब्दूला भरभरुन प्रेम दिलं. बिग बॉसमधली अब्दूचा प्रवास संपला असला तरी, त्याला पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. अब्दू […]
मुंबई : ‘बिग बॉस 16 ‘ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अब्दू रोझिक (Abdu Rozik) याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. एकेकाळी रस्त्यावर गाणं गाणारा अब्दू आज एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. ‘बिग बॉस 16 ‘ दरम्यान प्रेक्षकांनी देखील अब्दूला भरभरुन प्रेम दिलं. बिग बॉसमधली अब्दूचा प्रवास संपला असला तरी, त्याला पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. अब्दू कयम त्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असतो.
बिग बॉसमध्ये सर्वात साधा दिसणारा अब्दू खऱ्या आयुष्यात मात्र रॉयल जीवन जगतो. सध्या अब्दूच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अब्दूचं घर एखाद्या आलिशान महालापेक्षा कमी नाही. अब्दूचं घर पाहून साजिद खान देखील हैराण झाला आहे.
तझाकिस्तान याठिकाणी जन्मलेला अब्दू एक रॉयल आयुष्य जगतो. याच दरम्यान सोशल मीडियावर अब्दूच्या घराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अब्दूच्या घराचा हॉल प्रचंड भव्य असल्याचं दिसत आहे. त्याच्या घरात व्हाईट मार्वलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
View this post on Instagram
अब्दूचं प्रचंड भव्य आहे. शिवाय अब्दूची खोली देखील खास पद्धतीत डिझाईन करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये अब्दूची महागडी कार देखील दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण हैराण होईल. पण अनेक सोशल मीडिया युजर्सने हे घर अब्दूचं नसल्याचं सांगितलं आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारं भव्य घर अब्दूचं नसून त्याच्या मित्राचं आहे असं सांगण्यात येत आहे. अब्दूच्या मित्राने घरात अब्दूसाठी खास खोली डिझाईन केली असल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामध्ये नक्की तथ्य काय हे फक्त अब्दूलाच ठावूक आहे.
अब्दूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रावर अब्दूला जवळपास ६.८ मिलियन युजर्स फॉलो करतात. एवढंच नाही, तर अनेक सेलिब्रिटी देखील अब्दूचं कौतुक करतात.
एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा देखील केला. एका मुलाखतीत अब्दूने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. अब्दू एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण ती मुलगी अब्दूला सोडून गेली